एक्स्प्लोर
पत्नीला उचलून नेण्याची जागतिक शर्यत, विजेत्या जोडप्याला पत्नीच्या वजनाइतकी बिअर
लिथुएनियाच्या जोडप्याने एक मिनिट सहा सेकंदाच्या कालावधीत 253.5 मीटर अंतराची अडथळ्याची शर्यत पार केली.
सोनकाजर्वी (फिनलंड) : जागतिक 'वाईफ कॅरिंग चॅम्पियनशीप' असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? पत्नीला खांद्यावर उचलून ठराविक अंतर पार करण्याची ही अनोखी शर्यत. फिनलंडमध्ये यंदा भरवल्या गेलेल्या या स्पर्धेत लिथुएनिया या दक्षिण युरोपीय देशातील जोडप्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. विजेत्या जोडप्याला पत्नीच्या वजनाइतकी बिअर बक्षिस म्हणून मिळाली.
विशेष म्हणजे या जोडप्याने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. वाईफ कॅरिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीमध्ये 24 स्पर्धक जोडप्यांची निवड झाली होती. वैतौटस किर्कीऔस्कस आणि त्याची पत्नी नेरिंगा किर्कीओस्कीन यांच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. त्यांनी एक मिनिट सहा सेकंदाच्या कालावधीत 253.5 मीटर अंतराची अडथळ्याची शर्यत पार केली.
सहा वेळा विजेते राहिलेल्या फिनलंडच्या जोडप्याला त्यांनी अवघ्या 0.1 सेकंदाच्या फरकाने पराभूत केलं. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना काही अंतर पाण्यातूनही पार करायचं होतं.
हे या स्पर्धेचं चोविसावं वर्ष होतं. त्याच्या प्राथमिक फेऱ्या यूएस, ऑस्ट्रेलिया, पोलंड आणि ब्रिटनमध्ये पार पडल्या होत्या. चार हजार लोकसंख्या असलेल्या फिनलंडमधील सोनकाजर्वी शहरात शनिवारी भरलेली अंतिम फेरी याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी हजारो पर्यटक आले होते.
पत्नीच्या वजनाइतकी बिअर मिळण्याच्या आशेने काही नवरोबा तिला खाऊ-पिऊ घालून जाडजूडही करत असतील. मात्र तिलाच पुन्हा खांद्यावर उचलून धावायचं असल्यामुळे, जरा विचार करणंही भाग आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement