एक्स्प्लोर
ट्रम्पना मिडल फिंगर दाखवणाऱ्या महिलेची नोकरीवरुन हकालपट्टी
50 वर्षीय ज्युली ब्रिस्कमन यांना सरकारी कंत्राटदार असलेल्या अकिमा एलएलसीने कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'मिडल फिंगर' दाखवणाऱ्या महिलेची नोकरीवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या घटनेचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
50 वर्षीय ज्युली ब्रिस्कमन यांना सरकारी कंत्राटदार असलेल्या अकिमा एलएलसीने कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्षांचा अवमान केल्याने ही कारवाई करण्यात आली नाही, तर ज्युली यांनी हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर प्रोफाईल फोटो ठेवून फर्मची सोशल मीडिया पॉलिसी पायदळी तुडवल्याचा ठपका ठेवण्यात आला.
काय आहे फोटो?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाहनांचा ताफा जाताना बाजुने ज्युली आपल्या सायकलवरुन जात आहेत. यावेळी ट्रम्प यांच्या दिशेने ज्युली यांनी 'मिडल फिंगर' (मधलं बोट) दाखवलं. मिडल फिंगर दाखवणं अवमान करण्याची एक पद्धत आहे. व्हर्जिनियातील स्टर्लिंगमध्ये घडलेला हा प्रकार व्हाईट हाऊसच्या फोटोग्राफरने कॅमेरात कैद केला. जगभरातील मीडियाने हा फोटो वापरल्यामुळे तो अल्पावधीतच व्हायरल झाला.
ज्युली ब्रिस्कमन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थक आहेत. वीकेंडनंतर अकिमाच्या ह्युमन रिसोर्स विभागाला या घटनेची कल्पना देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या बॉसनीच त्यांना मीटिंगसाठी बोलावून घेतलं आणि सोशल मीडिया पॉलिसी मोडल्याबद्दल कानउघडणी केली.
'आम्ही तुला नोकरीवरुन कमी करत आहोत. तुम्ही शिवराळ किंवा आक्षेपार्ह गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करु शकत नाहीत.' असं ज्युली यांना सांगण्यात आलं. सरकारचे कंत्राटदार असल्यामुळे या फोटोचा अकिमा कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असंही बॉसनी सांगितलं.
ज्युली ब्रिस्कमन अकिमाच्या मार्केटिंग टीममध्ये सहा महिन्यांपासून कार्यरत होत्या. 'हा प्रकार घडला, तेव्हा आपण कामावर नव्हे, तर सुट्टीवर होतो. त्याचप्रमाणे आपल्या सोशल मीडिया पेजवर कंपनीचा उल्लेखही नाही' असं ज्युली यांनी सांगितलं.
'लास वेगासमध्ये 500 जणांवर गोळीबार झाला, पण ट्रम्पनी काहीच केलं नाही. प्युर्टो रिकोमध्ये वादळ आलं असताना हे महाशय गोल्फ खेळत होते. त्यामुळे मी चिडले होते आणि फ्रस्ट्रेट होते, म्हणून मिडल फिंगर दाखवलं, असंही त्यांनी सांगितलं'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement