Joe Biden : दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून अमेरिकसह 5 देशांनी जी 20 परिषदेत बोट दाखवूनही मोदी सरकारचा कानाडोळा?
अमेरिकसह पाच देशांनी नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. फायन्साशिअल टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
लंडन (इंग्लंड) : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांची कॅनडात हत्या झाल्यानंतर कॅनडा सरकारकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले. या घटनेनंतर आता दोन्ही पक्षातील द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताकडून कॅनडा व्हिसावरही बंदी घालण्यात आली आहे. कॅनडाने केलेल्या थेट आरोपानंतर भारतात संतापाची लाट उसळली असतानाच आता अमेरिकसह पाच देशांनी नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. फायन्साशिअल टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह इतर पाश्चिमात्य देशांनी निज्जरचा हत्येचा मुद्दा जी 20 परिषदेत उपस्थित केला होता, असेही या वृत्तात म्हटले आहे. यामुळे आता जी 20 आयोजन करताना भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना मोदी सरकारकडून कानाडोळा करण्यात आला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाच देशांकडून दहशतवादी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित
जी 20 परिषदेत झालेल्या द्विपक्षीय चर्चेशी अगदी जवळून संबंध आलेल्या तीन उच्चपदस्थांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये जी 20 परिषदेमध्ये फाईव्ह आय असलेल्या (गुप्तचर नेटवर्कसाठी माहितीची देवाणघेवाण करणे) अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी द्विपक्षीय चर्चा करताना दहशतवादी निज्जरच्या हत्येचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उपस्थित केल्याचे म्हटले आहे. हा विषय इतक्यावर थांबला नसून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा मुद्दा थेट मोदींकडे उपस्थित करणं महत्वाचं असल्याचे म्हटले होते, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
व्हाईट हाऊसने दावा फेटाळला
दरम्यान, या करण्यात आलेल्या खळबळजनक दाव्यावर व्हाईट हाऊसकडून कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. दुसरीकडे, कॅनडाने आपल्या सहकारी देशांतील नेत्यांकडे हा मुद्दा थेट मोदींकडे उपस्थित करण्यास सांगितले होते, असेही या प्रकरणाशी निगडीत असलेल्या दोन उच्चपदस्थांनी सांगितले. खासगीत मुद्दा उपस्थित करावा, असेही कॅनडाकडून सांगण्यात आले होते.
अमेरिकेकडून डबल ढोलकीचा प्रयत्न?
कॅनडाने कान भरल्यानंतर अमेरिकेकडून डबल ढोलकीचा प्रयत्न केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. चीनला थाऱ्यावर आणण्यासाठी अमेरिकेकडून भारताला बळ देण्यासाठी प्रयत्न असतानाच कॅनडाच्या मुद्यात हात घालून काय मिळवलं? असाही प्रश्न विचारला जात आहे. अलीकडेच मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या