एक्स्प्लोर

Israel-Palestine Escalation : एक शहर, तीन धर्मांचा दावा; मुस्लीमांच्या जगातील सर्वात पवित्र तिसऱ्या मशिदीभोवती युद्धाची ठिणगी; काय घडतंय, काय बिघडतंय?

हमासने इस्रायलविरुद्धच्या त्यांच्या ऑपरेशनला 'अल-अक्सा स्टॉर्म' (Al-Aqsa Storm) असे नाव दिले आणि इस्रायलने प्रत्युत्तरातील कारवाईला 'स्वॉर्ड्स ऑफ आयर्न' (Swords of Iron) नाव दिलं आहे.

जेरुसलेम (इस्त्रायल) : अंतर्गत यादवीने पोखरलेल्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine Escalation) युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. आज ( 7 ऑक्टोबर) हमासने इस्रायलवर रॉकेट बॅरेज आणि घुसखोरीच्या रूपात मोठा हल्ला करून इस्रायलवर आक्रमण केले. या हल्ल्यात अनेक इस्रायली सैनिक, पोलिस आणि नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायली सरकारने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. इस्त्रायलने हे युद्ध असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, हमासने इस्रायलविरुद्धच्या त्यांच्या ऑपरेशनला 'अल-अक्सा स्टॉर्म' (Al-Aqsa Storm) असे नाव दिले आणि इस्रायलने प्रत्युत्तरातील कारवाईला 'स्वॉर्ड्स ऑफ आयर्न' (Swords of Iron) नाव दिलं आहे. गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी गटाने सुरू केलेल्या हवाई, सागरी आणि जमिनीवरील ऑपरेशन्सचा समावेश असलेल्या  हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास आणखी एका संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत. इस्त्रायलने सुद्धा जोरदार बाॅम्बवर्षाव करत  प्रतीकार केला आहे.

नेमकं काय झालं?

पॅलेस्टिनी सशस्त्र गट असलेल्या हमासने 2021 मध्ये इस्रायल आणि हमासमध्ये 11 दिवसांचे युद्ध लढल्यानंतर आता सर्वात गंभीर इस्रायलविरूद्ध “ऑपरेशन अल-अक्सा फ्लड” (Operation Al-Aqsa Flood) सुरू केले आहे. हमासने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी 5,000 रॉकेट डागले आहेत. इस्रायलने सशस्त्र गटातील सैनिक त्यांच्या हद्दीत घुसले असल्याचा दावा केला आहे. इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, हमासने जमीन, समुद्र आणि हवेतून हल्ला केला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे सहाच्या सुमारास रॉकेट डागण्यात आले. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील हमास गटाच्या विरोधात “ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स” सुरू केलं आहे. पहिला हल्ला सिमचॅट टोराह येथे सुट्टीच्या दिवशी घडला. ज्यू लोकांच्या सणाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच सुक्कोटदिवशी हल्ला झाला. 

एक शहर, तीन धर्मांचा दावा 

जगातील सर्वात पवित्रभूमी म्हणून इस्त्रायलमधील जेरुसलेमकडे पाहिले जाते. याच शहराच्या ताब्यावरून अनेकवेळा रक्तपात झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ख्रिश्चन, मुस्लीम आणि यहुदी म्हणजेच ज्यू यांच्यात वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. पूर्व जेरुसलेममध्ये ख्रिश्चन, ज्यू, अरब, आणि अर्मेनियम धर्माच्या चार महत्त्वाच्या वास्तू आहेत. मुस्लिमांचं तिसरं पवित्र स्थळ असलेली अल अक्सा मशीद सुद्धा याच ठिकाणी आहे. 

मुस्लीमांसाठी अल अक्सा मशीद का महत्वाची?

मुस्लीमांसाठी ही मशीद मक्का मदिनांत सर्वात पवित्र मशीद आहे. मोहम्मद पैगंबरांनी येथूनच त्यांची जीवनयात्रा संपवली अशी मुस्लीम धर्मियांची धारणा आहे. दुसरीकडे, येशू ख्रिस्तांचा मृत्यू आणि पुनरुत्थान याच्या केंद्रस्थानी असलेलं चर्च ऑफ होली सेल्पकर हे ही पूर्व जेरुसलेममध्ये आहे. या दोन जागांजवळ आहे, ज्यू धर्मियांचं पवित्र स्थळ ज्याला कोटल किंवा पश्चिमी भिंत असं संबोधतात. या भिंतीच्या पायापासून जगाची निर्मिती झाली अशी ज्यू धर्मियांची धारणा आहे.  चौथी जागा ही अर्मेनियम वंशाच्या लोकांची आहे. या चारही जागा जेरुसलेमला धार्मिक दृष्ट्‍या महत्त्वाच्या अत्यंत संवेदनशील आहेत.

कुठे झाले हल्ले?

उत्तरेकडे तेल अवीवपर्यंत रॉकेट डागण्यात आले. हमासने दक्षिण इस्रायलमध्येही सैनिक पाठवले आहेत. इस्त्रायली मीडियाने म्हटले आहे की बंदुकधारींनी सडेरोट शहरात जाणाऱ्यांवर गोळीबार केला होता आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या फुटेजमध्ये शहराच्या रस्त्यांवर तसेच जीपमधील बंदूकधारी ग्रामीण भागात फिरताना दिसत आहेत. एका अहवालात दावा केला आहे की हमासच्या सैनिकांनी अनेक इस्रायली नागरी लोकसंख्या केंद्रांवर ताबा मिळवला आहे, जिथे रहिवासी त्यांच्या सरकारकडे मदतीची याचना करत होते. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर डझनभर लढाऊ विमाने हल्ले करत आहेत. टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या, केफर अझा, सडेरोट, सुफा, नहल ओझ, मॅगेन, बेरी आणि रीम लष्करी तळ या शहरांमध्ये आणि त्याच्या आसपास बंदुकीच्या लढाया सुरू आहेत.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किती बळी गेले?

आपत्कालीन सेवांचा हवाला देत स्थानिक माध्यमांनी सांगितले की, किमान 22 इस्रायली ठार झाले आहेत. 500 हून अधिक इस्रायली जखमी झाले आहेत, रॉयटर्सने देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे.

हमासने इस्रायलवर हल्ला का केला?

हमासचे प्रवक्ते खालेद कादोमी यांनी 'अल जझीरा'शी बोलताना सांगितले आहे की या गटाची लष्करी कारवाई अनेक दशकांपासून पॅलेस्टिनींवर झालेल्या सर्व अत्याचारांना प्रतिसाद म्हणून आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायाने गाझा, पॅलेस्टिनी लोकांवर, अल-अक्सासारख्या आमच्या पवित्र स्थळांवर होणारे अत्याचार थांबवावेत अशी आमची इच्छा आहे. या सर्व गोष्टी ही लढाई सुरू करण्यामागे कारणीभूत आहेत, असे त्यांनी सांगितले. गाझा पट्टीच्या सीमावर्ती भागात इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी गटांमध्ये झालेल्या संघर्षात किमान चार पॅलेस्टिनी ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत, असे अनाडोलू वृत्तसंस्थेने सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धसSuresh Dhas meets Dhananjay Munde : धस - मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP MajhaSuresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
सोने अन् चांदीच्या दरात तेजीचं सत्र कायम, सोने महागलं, चांदीचं काय?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.