एक्स्प्लोर

Israel-Hamas conflict : माणुसकीचाच मुडदा पाडला; इस्त्रायलकडून गाझापट्टीत वरुन बाॅम्बवर्षाव, खालून लाईट, पाणी, इंधन, खाद्यपुरवठा तोडून संपूर्ण 'नाकाबंदी'चे आदेश!

स्त्रायलकडून गाझापट्टीमधील नागरी वस्त्या सुद्धा टार्गेट करण्यात आल्या आहेत. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. 

गाझापट्टी (पॅेलेस्टाईन) : स्त्रायलवर हमासकडून (Israel-Hamas conflict) करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्याची मोठी किंमत गाझापट्टीतील सर्वसामान्य जीवांना चुकवावी लागली आहे. इस्त्रायलकडून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा घनघोर पद्धतीने गाझापट्टीत हल्ले सुरु असून अनेक पॅलेस्टिनी मृत्यूमुखी पडले आहेत. इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. 

वरून बाॅम्बवर्षाव खालून नाकाबंदी 

इस्त्रायलकडून वरून बाॅम्बवर्षाव सुरु असतानाच जमिनीवरूनही पूर्णत: नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पाणी, लाईट, खाद्यपुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रायलकडून देण्यात आले आहेत. फक्त तीन दिवसात गाझापट्टीत 1 लाख 20 हजारांवर विस्थापित झाले आहेत. दुसरीकडे, इस्त्रायलकडून एक लाखां राखीव तुकडी गाझापट्टीवर तैनात केली आहे. याठिकाणी हमासकडून 130  इस्त्रायलींना ओलीस ठेवल्याचे बोलले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 510 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इस्त्रायलमध्ये 800 जणांचा मृत्यू झाला आहे.  

हमास सैनिक आणि इस्रायली सैन्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायली स्थायिकांनी अल-अक्सा मशिदीच्या कंपाऊंडवर हल्ला केल्यानंतर तसेच इस्रायलकडून विक्रमी संख्येने पॅलेस्टिनी मारले गेल्यानंतर हमासकडून हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण इस्रायलमधील तीन मुख्य भागात हमास सैनिक आणि इस्रायली सैन्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. कर्मियामधील किबुट्झ येथे आणि अॅश्केलॉन आणि सेडरॉट शहरांमध्ये हा संघर्ष सुरु आहे. 

100 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले

हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गाझामध्ये 100 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. हमास अधिकारी मौसा अबू मारझौक यांनी रविवारी अरबी भाषेत ही माहिती दिली. वरिष्ठ इस्रायली अधिकारी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आहेत, असाही दावा केला आहे. हल्ला रोखण्यात अयशस्वी झाल्याने प्रश्नांचा भडिमार होत असलेल्या इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, त्यांनी गाझाच्या सीमेवरील बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले आहे, शेकडो लोकांना ठार केले आणि डझनभर कैदी म्हणून घेतले आहेत. 

इराणने हल्ल्यास मदत केल्याचा दावा 

इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या देशाने गाझाजवळ 100,000 राखीव सैन्य जमा केले आहे. दुसरीकडे, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातही मोठा दावा करण्यात आला आहे. इराणने हमासला आठवड्याच्या शेवटी इस्रायलविरूद्ध अचानक हल्ल्याची योजना आखण्यास मदत केली, परंतु संयुक्त राष्ट्रातील इराणच्या मिशनने सांगितले की इराण हल्ल्यांमध्ये सामील नाही. इराणच्या मिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पॅलेस्टाईनच्या अखंड समर्थनात ठामपणे उभे आहोत, तथापि, आम्ही हल्ल्यात सहभागी नाही कारण तो केवळ पॅलेस्टाईनने केला आहे.”

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget