एक्स्प्लोर

एअर इंडियाच्या क्रूवर थुंकल्याने तुरुंगवासवास भोगलेली महिला मृतावस्थेत आढळली

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाईटने मुंबईहून लंडनला जाताना अतिरिक्त मद्य देण्यास नकार दिल्यामुळे आयरिश वकील सिमॉन बर्न्स क्रू मेंबरवर थुंकली होती

मुंबई : 'एअर इंडिया'च्या विमानात अधिक मद्य नाकारल्याने धिंगाणा घालून क्रू मेंबरवर थुंकल्याबद्दल तुरुंगवासवास भोगलेली परदेशी महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. 50 वर्षीय आयरिश वकील सिमॉन बर्न्सने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाईटने सिमॉन मुंबईहून लंडनला जात होती. नऊ तासांच्या विमानात सिमॉनला अतिरिक्त मद्य देण्यास केबिन मेंबर्सनी नकार दिला. त्यामुळे संतापून तिने क्रूवर वर्णभेदी टिप्पणी केली होती. इतक्यावरच न थांबता तिने त्यांच्या थोंडावर थुंकण्याइतकं टोकाचं पाऊल गाठलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. 'मी तुमच्या माणसांसाठी काम करते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी वकील. त्याच्या मोबदल्यात एक पैसाही घेत नाही. पण तुम्ही मला एक ग्लासभर वाईन देऊ शकत नाही. हे बरोबर आहे का?' असं सिमॉन बोलल्याचं वायरल व्हिडिओमध्ये ऐकू येत होतं. एअर इंडियाने सिमॉनविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन सिमॉनला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोषी आढळल्यामुळे तिला एप्रिल 2019 मध्ये सहा महिन्यांचा कारावास सुनावला. तिची रवानगी यूकेमधील तुरुंगात झाली. परंतु 20 मे रोजी तिची सुटका झाली. एक जुलै रोजी सिमॉन इंग्लंडमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी सिमॉनचा मृत्यू संशयास्पद नसल्याचं सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget