Iran vs Israel : इराणनं 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला, इस्त्रायलकडून व्हिडीओ शेअर करत मनसुबे जाहीर, जगाचं टेन्शन वाढणार
Iran vs Israel : इराणनं इस्त्रायलवर 200 क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. कारण, इस्त्रायलची गुप्तचर संघटना मोसादनं एक व्हिडीओ शेअर करत इराणला इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : इराणनं इस्त्रायलवर 200 क्षेपणास्त्रांचा मारा करुन हमास आणि हिजबुल्लाहच्या नेत्यांच्या मृत्यूचा बदला घेतला. इराणनं इस्त्रायलवर केलेला हल्ला स्वसंरक्षणासाठी असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या हल्ल्यानंतर अमेरिकेनं इस्त्रायलच्या बाजून भूमिका घेतली आहे. जो बायडन यांनी इराणची क्षेपणास्त्र पाडण्याचे आदेश त्यांच्या सैन्याला दिले. दुसरीकडे इस्त्रायलनं देखील पलटवार करण्याचा इशारा दिला आहे. क्षेपणास्त्र हल्ला करुन इराणनं चूक केली असल्याचं प्रत्युत्तर इस्त्रायलनं दिलं आहे. इराणची गुप्तचर संघटना मोसादच्या मुख्यालयाजवळ देखील इराणनं क्षेपणास्त्रांचा मारा केला.
मोसादकडून व्हिडीओ पोस्ट
इस्त्रायलच्या एका अधिकाऱ्यानं आम्ही जेव्हा हल्ला करु तेव्हा इराण काय करणार हे पाहणार आहोत. इराणमधील तेल विहिरी आणि अणूऊर्जा वीज प्रकल्प इस्त्रायलच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. मोसादनं इराणच्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा वीज प्रकल्पाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या पॉवर प्लँटमध्ये मेगावॅट वीज निर्मिती केली जाते, अशी माहिती देखील मोसादनं पोस्ट केली आहे. त्यामुळं इस्त्रायलच्या निशाण्यावर इराणचा अणूऊर्जा वीज प्रकल्प तर नाही ना अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत हमास, हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु होतं. आता या वादात इराणनं उडी घेत इस्त्रायलवर 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला. याला प्रत्युत्तर देताना इराणला संपवण्याची शपथ इस्त्रायलनं घेतली आहे. अमेरिकेतली वेबसाईट Axios च्या रिपोर्टनुसार इस्त्रायलकडून इराणच्या अणूऊर्जा प्रकल्प आणि तेल विहिरींवर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळं इराणच्या आजू बाजूच्या देशांसाठी धोक्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
इस्त्रायलच्या अधिकाऱ्यानं जेव्हा आम्ही हल्ला करु तेव्हा इराण काय करेल हे पाहणार आहोत. इराणवर असा हल्ला करु की ते विसरु शकणार नाहीत. इस्त्रायलच्या सूत्रांच्या हवाल्यानं जारी झालेल्या रिपोर्टनुसार तेल विहिरींवर हल्ला केला जाऊ शकतो. याशिवाय इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीम्स देखील निशाण्यावर असतील.
इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करताना लढाऊ विमानांचा वापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. ड्रोनद्वारे देखील हल्ला केला जाऊ शकतो. तेहरानमध्ये घसून इस्त्रायलनं इस्माइल हानियेहला मारलं होतं तसाच प्रकार पुन्हा होऊ शकतो.
इराण आणि इस्त्रायल पहिल्यांदा आमने सामने आले आहेत. एप्रिल महिन्यात दोन्ही देशांमध्ये छोटा संघर्ष झाला होता. मात्र, यावेळी तीव्र संघर्ष होत आहे.अमेरिकेनं इस्त्रायलला मदत म्हणून अतिरिक्त सैन्य पाठवण्याची घोषणा केली आहे. इस्त्रायलच्या हल्यानं मध्यपूर्वेत गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. इराण शिवाय इतर देशांनी उघडपणे इस्त्रायल विरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली नाही. सौदी अरेबिया आणि यूएई हे देश तटस्थ आहेत.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष कुठंपर्यंत चालणार हे पाहावं लागेल. बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणला किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे.
Iran's largest power plant:
— Mossad Commentary (@MOSSADil) October 1, 2024
This power plant produces a total of about 2880 megawatts of electricity pic.twitter.com/TjKjdLrSOV
इतर बातम्या :