एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अफगाणिस्तानात सात भारतीय अभियंत्यांचं अपहरण
अफगाणिस्तानमध्ये सात भारतीय अभियंत्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. यांच्यासोबत एका अफगाणिस्तानमधील व्यक्तीचाही समावेश आहे.
काबुल : अफगाणिस्तानमध्ये सात भारतीय अभियंत्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. यांच्यासोबत एका अफगाणिस्तानमधील व्यक्तीचाही समावेश आहे. या सर्वांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
उत्तर अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतातील ही घटना आहे. हे सर्व जण एका मिनी बसमधून पॉवर प्लँटकडे जात होते. यावेळी अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवला आणि बसचालकासह सर्वांचं अपहरण केलं, अशी माहिती बागलान पोलिसांचे प्रवक्ते जबीउल्लाह यांनी दिली.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतीय दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे सर्व अभियंते 'द अफगाणिस्तान ब्रेशना शेरकट'साठी काम करतात. ही कंपनी पॉवर स्टेशन बनवण्याचं काम करते.
भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये 150 पेक्षा जास्त भारतीय इंजिनीअर आणि टेक्निकल एक्स्पर्ट देशाच्या पायाभूत सुविधांसंदर्भातील प्रकल्पात काम करतात.
दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून या घटनेवर नजर असल्याचं म्हटलं आहे.
अफगाणिस्तानमध्ये खंडणीसाठी अपहरणाच्या अनेक घटना घडतात. गरीबी आणि वाढती बेरोजगारी यामागचं प्रमुख कारण आहे. 2016 साली देखील एका भारतीयाचं अपहरण करण्यात आलं होतं, ज्याची तब्बल 40 दिवसांनी सुटका झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement