(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Hamas War : भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला
Israel Palestine Conflict : भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास (Israel Palestine Conflict) यांच्या युद्धाला 15 दिवस उलटून गेले आहेत. पण हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीत. इस्रायल पॅलेस्टिन संघर्षच्या काळात (Israel Palestine Conflict) भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत (Medical Aid) आणि जीवनाश्यक वस्तू (Humanitarian Aid) पाठवल्या आहेत. एकीकडे काही इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) कडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहे. दुसरीकडे इतर देश हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायल आणि हमास संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.
भारताकडून पॅलेस्टाईनला मदत!
इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझातील नागरिकांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत आहे, तर औषधांचा साठाही अपुरा आहे. भारताने रविवारी पॅलेस्टाईनला मदतीचा हात दिला. भारताने संघर्षात अडकलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत. भारताने पॅलेस्टिनी नागरिकांच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते (Official Spokesperson of the Ministry of External Affairs of India) अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत दिली आहे.
औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला
🇮🇳 sends Humanitarian aid to the people of 🇵🇸!
— Arindam Bagchi (@MEAIndia) October 22, 2023
An IAF C-17 flight carrying nearly 6.5 tonnes of medical aid and 32 tonnes of disaster relief material for the people of Palestine departs for El-Arish airport in Egypt.
The material includes essential life-saving medicines,… pic.twitter.com/28XI6992Ph
या ट्विटमध्ये त्यांनी लिहीलं आहे की, पॅलेस्टाईनमधील नागरिकासाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन IAF C-17 उड्डाण इजिप्तमधील अल-अरिश विमानतळाकडे रवाना झालं. यामध्ये औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छताविषयक वस्तू, पाणी शुद्धीकरण गोळ्या यासह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
Israel-Hamas Death Toll : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंतची जीवितहानी
- गाझा : 4469 लोक ठार, 14000 जखमी
- इस्रायल : 1402 ठार, 5,007 जखमी
- वेस्ट बँक : 85 ठार, 1400 जखमी
- लेबनॉन : 27 ठार, 9 जखमी
- एकूण : 5983 ठार, 20416 जखमी
- ओलिस : सुमारे 200 लोक बंधक
Israel-Gaza Update : मदत सामग्री गाझामध्ये पोहोचली
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर 16 दिवसांनी काहीसा दिलासा मिळाल्याची बातमी आली आहे. अन्न, पाणी आणि औषधे यांसारख्या मदत सामग्रीने भरलेला ट्रक शनिवारी इजिप्तमधून रफाह क्रॉसिंगवरून गाझामध्ये दाखल झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 20 ट्रक इजिप्तची सीमा ओलांडून गेले होते. मात्र, रफाह क्रॉसिंगवर सुमारे 170 ट्रक उभे होते आणि त्यापैकी 100 ट्रक पॅलेस्टाईनमध्ये जाणार होते, पण सध्या इस्रायलने फक्त 20 ट्रकला प्रवेश दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :