BrahMos Missile : फिलिपाईन्सने भारताकडून खरेदी केलं ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र, दोन्ही देशांकडून करारावर स्वाक्षरी
BrahMos Missile : ब्रह्मोस सुपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र या शतकातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांमध्ये गणले जाते. त्याची रेंज सुमारे 350 ते 400 किमी आहे.
BrahMos Missile India-Philippines Deal : ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत भारत (India) आणि फिलिपिन्समध्ये (Philippines) करार झाला आहे. फिलिपिन्सचे संरक्षण मंत्रालय आणि फिलिपिन्स नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि मनिला येथील भारताचे राजदूत आणि ब्रह्मोस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हा करार भारताकडून सुमारे 37.50 दशलक्ष डॉलर (सुमारे 2777 दशलक्ष) मध्ये झाला आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची समुद्रातून प्रक्षेपित केलेली अँटी शिप क्रूझ क्षेपणास्त्र आवृत्ती फिलिपाईन्सला दिली जात आहे.
फिलिपाईन्सने भारताकडून खरेदी केले ब्रह्मोस क्षेपणास्त्र
चीन आणि फिलिपाईन्समध्ये समुद्री भागात गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे. फिलिपाईन्स स्वतःचा दावा करत असलेल्या समुद्रात अनेक महिन्यांपासून चिनी जहाजे तळ ठोकून आहेत. फिलिपाईन्सने सर्व प्रयत्न करूनही चिनी जहाज माघार घ्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे घेऊन फिलिपाईन्स आपले नौदल अधिक शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या करारानंतर फिलिपाईन्सच्या नौदलाची ताकद लक्षणीय वाढणार आहे.
290 किलोमीटरची रेंज
ब्रह्मोस हे जगातील सर्वात जलद सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. 2.5 टन वजनाचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र 290 किमी परिसरात ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करतं. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार ब्रह्मोस मिसाइल निर्यातीची ही पहिली डील आहे. भारत-फिलिपाईन्समध्ये झालेल्या या कारारामुळे फिलिपाईन्ससह इतर आशियाई देश इंडोनेशिया, व्हिएतनाम बरोबरही करार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 35 हजार 532 रुग्ण, 871 जणांचा मृत्यू
- Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...
- धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha