एक्स्प्लोर

16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना

मस्साजोग घटना ताजी असतानाच धाराशिवमध्ये पवनचक्की ठेकेदारानं  ४०, ५० बाऊंसर आणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

Dharashiv Crime: बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून घडलेल्या खूनाच्या घटनेचा धक्का अजून ताजा असतानाच धाराशिव जिल्ह्यातही पवनचक्की ठेकेदारांचा दहशत माजवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा या गावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामाला गावकऱ्यांनी परवानगी नाकारली होती. मात्र, गावकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी 16-17 काळ्या स्कॉर्पियो गाड्यांमधून 40-50 बाऊन्सर्स गावात दाखल झाले आणि धमकावण्याचा थरार सुरू केला.

गावात बाऊन्सर्सनी गावकऱ्यांना अरेरावीच्या सुरात धमकावत दहशतीचं वातावरण तयार केलं. शुक्रवारी तब्बल  दोन तास गावभर ही गुंडागिरी सुरू होती, मात्र वारंवार संपर्क साधूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर तुळजापूरचे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी विशाल रोचकारी यांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केलं.

पोलिसांच्या मदतीनेच गावात दहशत?

पवनचक्की कंपनीचे गुंड ठेकेदार पोलिसांच्या मदतीनेच गावात दहशत निर्माण करून बळजबरीने पवनचक्क्या उभारत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तशी  तक्रार त्यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना दिली आहे . मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पवनचक्की ठेकेदाराच्या या दहशतीने गावकरी मात्र पूर्ण धास्तावलेले पाहायला मिळाले. या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. ठेकेदार आणि बाऊन्सर्सच्या दहशतीने गावकरी घाबरले आहेत. प्रशासनाने या गुंडगिरीवर तत्काळ कारवाई करावी आणि दोषींवर कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. बीडनंतर धाराशिव जिल्ह्यातही अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.

बीड प्रकरणानंतर धाराशिव पोलिस अलर्टमोडवर

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर धाराशिवचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली.धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रोजेक्ट सुरू असून पोलीस अधीक्षकांच्या बैठकीला 60 ते 70 प्रतिनिधींची हजेरी होती. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर सुरु असून संतोष देशमुख हत्याकांडानंतर प्रशासनही धास्तावलं आहे. बीडच्या शेजारीच असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टींवर नजर राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच पवनचक्की प्रकल्पावरील खासगी सुरक्षा रक्षकांकडून कोणाला दमदाटी होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. 

हेही वाचा:

मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget