एक्स्प्लोर

Khalistani : ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांसोबत गैरवर्तन, गुरुद्वारेत जाण्यापासून रोखलं; भारताकडून संताप व्यक्त

India Ambassador's UK Gurdwara Visit Disrupted : भारताने घटनेवर संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने, हे वर्तन अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

UK Khalistan Supporter : ब्रिटनमधील (Britain) भारतीय उच्चायुक्त (Indian Ambassador) विक्रम दोराईस्वामी (Vikram Doraiswami) यांना स्कॉटलंड (Scotland) मधील गुरुद्वारेमध्ये (Gurudwara) जाण्यापासून रोखण्यात आलं. भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्यासोबत खलिस्तानी समर्थकांनी गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानींनी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं. भारताने घटनेवर संताप व्यक्त करत याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने याप्रकरणी एक निवेदन जारी करत हे वर्तन अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. भारतीय उच्चायुक्तांसोबत केलेल्या गैरवर्तनाची ब्रिटीश नेत्यांनी देखील निंदा केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. 

ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांसोबत गैरवर्तन

या प्रकरणी स्कॉटलंड पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी 1.05 च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ग्लासगोच्या अल्बर्ट ड्राईव्ह परिसरात गोंधळ झाल्याचा अहवाल मिळाला, ज्याची चौकशी केली जात आहे. वृत्तसंस्था एएनआयला पाठवलेल्या ईमेलमध्ये स्कॉटलंड पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला ग्लासगोच्या अल्बर्ट ड्राईव्ह परिसरात गडबड झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारेत जाण्यापासून रोखलं

भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी तीन व्यक्तींना जाणूनबुझून गुरुद्वारा समिती उच्चायुक्त आणि भारताचे कौन्सुलेट जनरलद्वारे आयोजित चर्चासत्रामध्ये अडथळे निर्माण केले. समुदाय आणि कौन्सुलरच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती.  समुदायाचे वरिष्ठ नेते, महिला समिती सदस्य आणि स्कॉटिश खासदार यांच्याकडून या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कट्टरपंथीयांनी त्यांना धमकावलं आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं. यामुळे वाद होऊ नये, यासाठी आयुक्त आणि कॉन्सुल जनरल हे कार्यक्रमस्थळावरून निघून गेले.

कॅनडानंतर आता ब्रिटनमध्येही खलिस्तानी आक्रमक

यापूर्वी, खलिस्तानींच्या एका गटाने अल्बर्ट ड्राइव्ह, ग्लासगो येथील गुरुद्वारा गुरु ग्रंथ साहिबच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी झटापट केली आणि दोराईस्वामी यांच्या कारचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला. खलिस्तान समर्थकांनी ऑनलाइन व्हिडीओ पोस्ट करत याचा संबंध कॅनडाच्या सरकारच्या आरोपाशी जोडला आहे. कॅनडाचे पंतप्रधाने जस्टिन टुड्रो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, भारताने कॅनडाचा आरोप फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान ट्रुडो यांच्या या आरोपानंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

ब्रिटिश मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

युकेच्या इंडो-पॅसिफिक मंत्री एनी मॅरी ट्रॅवलियन यांनी परदेशी मुत्सद्दींची सुरक्षा महत्वाची असल्याचं म्हणत चिंता व्यक्त करत सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहीलं आहे की, 'भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना गुरुद्वारेमधील बैठकीत जाण्यापासून रोखण्यात आलं हे चिंताजनक आहे. परदेशी मुत्सुद्दीची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. युकेमधील प्रार्थनास्थळांचे दरवारे सर्वांसाठी खुले असायला हवे.'

महत्वाच्या इतर बातम्या :

Hardeep Singh Nijjar : 'होय, माझा बाप कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंधित', पोरानं बिंग फोडल्याने कॅनडाच्या पंतप्रधानांचा पर्दाफाश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget