(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Political Crisis : इम्रान खान यांचे समर्थक उतरले रस्त्यावर, सत्तेतून हकालपट्टी केल्याचा निषेध, अनेक शहरांमध्ये आंदोलनं
Imran Khan : इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक शहरांमध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत. इम्रान खान आता सत्तेबाहेर असले तरी त्यांना पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे.
Pakistan Political Crisis : पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठरावाला बहुमत मिळाल्याने इम्रान खान (Imran Khan) यांना पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र, विधानसभेच्या बाहेर त्यांना पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याच दिसून येत आहे. इ्म्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या हकालपट्टीच्या निषेधार्थ इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. निदर्शकांची संख्या मोठी आहे. यामध्ये बालकं, तरुण, महिला, वृद्ध अशा सर्व वर्गातील नागरिकांचा समावेश आहे. असेच दृश्य रविवारी अनेक शहरांमध्ये पाहायला मिळालं. यावेळी आंदोलक इम्रान खान यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान समर्थकांनी रविवारी इस्लामाबाद, पेशावर, कराची आणि लाहोरसारख्या शहरांमध्ये रस्त्यावर रॅली काढल्या. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांनी बॅनर आणि पोस्टरबाजीबही केली. या आंदोलकांकडून इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्याचा निषेध करण्यात आला.
غیرتمند پاکستانی جہاں بھی ہے اسکو #امپورٹڈ_حکومت_نامنظور ہے pic.twitter.com/vjgWY1RaYn
— PTI (@PTIofficial) April 11, 2022
इम्रान खान यांनी मानले समर्थकांचे आभार
दरम्यान, जनतेकडून मिळत असलेल्या या पाठिंब्याबद्दल इम्रान खान यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, 'अमेरिका संरक्षित नवीन सरकारच्या विरोधात बाहेर पडल्याबद्दल तसेच प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हा जमाव सांगतो की पाकिस्तानच्या नागरिकांनी या सरकारला नाकारलं आहे.'
Never have such crowds come out so spontaneously and in such numbers in our history, rejecting the imported govt led by crooks. pic.twitter.com/YWrvD1u8MM
— Imran Khan (@ImranKhanPTI) April 10, 2022
काय म्हणाले इम्रान खान
इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर नागरिकांना आवाहन केले होते की, आता स्वातंत्र्यासाठी लढण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुन्हा परकीय कारस्थानाचा मुद्द्याचा पुनरुच्चार केला तसेच अमेरिकेने षड्यंत्र रचून त्यांना सत्तेवरून बेदखल केल्याचं सांगितलं. तेव्हापासून इम्रान खान यांना पाकिस्तानी जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pakistan Crisis : शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे पीएम; चीनच्या माध्यमांनी केलं सूचक वक्तव्य
- Pakistan : आज शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होणार, शपथविधी आधी कोर्टात हजेरी?
- Imran Khan : सत्तेच्या 'पीच'वर कसे बाद झाले इम्रान खान; असा झाला 'पव्हेलियन'मध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha