अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ बनवायचे होते, मी नकार दिला; इम्रान खान यांचा दावा
Imran Khan Claims: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेने देशात लष्करी तळ बनवण्याची मागणी केली होती.
Imran Khan Claims: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेने देशात लष्करी तळ बनवण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी कधीही त्यांची ही मागणी मान्य केली नाही. इम्रान खान यांना गेल्या महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. इम्रान म्हणाले की, अमेरिकेला पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बनवायचे होते, जेणेकरून ते येथे अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देऊ शकतील. मात्र त्यांनी त्यास नकार दिला.
इम्रान खान पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दहशतवादाविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानातील 80,000 लोकांनी आधीच आपला जीव गमावला आहे. असे असूनही, त्यांच्या बलिदानाचे कधीही कौतुक झाले नाही, उलट अमेरिकन राजकारणी आम्हाला जबाबदार धरू लागले.
'मी यासाठी कधीच तयार नव्हतो'
इम्रान खान पुढे म्हणाले, आधी त्यांनी आमच्यावर आरोप केले, मग त्यांनी आमचा देश आणि आदिवासी भाग उद्ध्वस्त केला. यानंतर त्यांनी लष्करी तळाची मागणी सुरू केली. पण मी त्यासाठी कधीच तयार नव्हतो आणि तिथूनच आमच्या अडचणी वाढण्यास सुरुवात झाली.
डॉनच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी जून 2021 मध्ये एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, पाकिस्तान अमेरिकेला लष्करी तळ आणि त्यांचा प्रदेश वापरण्याची अजिबात परवानगी देणार नाही. इम्रान खानचे नवीन विधान त्यांनी अलीकडील पॉडकास्टमध्ये केलेल्या टिप्पण्यांसारखेच आहे. ज्यात ते म्हणाले होते की, अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय दहशतवाद रोखण्यासाठी ते येथे लपण्याचे ठिकाण शोधत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Imran Khan Claims: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेने देशात लष्करी तळ बनवण्याची मागणी केली होती.
- पूनावाला यांचा एलोन मस्क यांना सल्ला, भारतात गुंतवणुकीबाबत म्हणाले...
- Electric Scooter Fire: इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लागणाऱ्या आगीचं कारण आले समोर
- वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीत सर्व्हे कमिटीला प्रवेश नाहीच, मशीद व्यवस्थापनाचा विरोध कायम; जाणून घ्या काय आहे वाद
- Taj Mahal : ताजमहालमधील त्या 22 बंद खोल्या उघडाव्यात, भाजपच्या प्रवक्त्याची लखनौ खंडपीठात याचिका