एक्स्प्लोर

रक्ताच्या थेबांवरुनही समजणार HIV, Hepatitis B आणि C चा संसर्ग, नवीन तंत्रज्ञानाची कमाल!

दरवर्षी जगभरात HIV-एड्स, Hepatitis B किंवा C या विषाणुंमुळे लाखो लोकांचा जीव जातो. 2030 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या रोगांचे उच्चाटन करण्याचा निर्धार केलाय. त्यासाठी सिंगल ब्लड ड्रॉप टेस्ट उपयोगी ठरणार आहे.

HIV and Hepatitis Test : हिपॅटायटीस बी किंवा सी हे यकृताशी (Liver) संबंधित संसर्गजन्य आजार आहेत. हे सर्व संसर्गजन्य आजार विषाणूंमुळे (Virus) पसरतात. आजाराची लक्षणे लवकर जाणवत नाहीत, त्यामुळे या विषाणूंची लागण किंवा संसर्ग कुणाला झालाय की नाही ते तपासणी केल्याशिवाय समजत नाही. मात्र लक्षणेच जाणवत नसल्यामुळे तपासणी तरी कशाची करायची असा प्रश्न पडतो. अनेकदा अपघातानेच या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं उघडकीस येतं. म्हणजे रक्तदान करण्यापूर्वी रक्त तपासलं जातं, तेव्हाच अनेकदा हिपॅटायटीसची लागण झाल्याचं बाधित व्यक्तीला समजतं. त्यानंतर लागण किती, किंवा कोणत्या प्रकारची हे समजण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. त्यासाठी वेगवेगळ्या वेळी सिरेंजभरून रक्तही घेतात. आता फक्त रक्ताच्या एका थेंबात जर हिपॅटायटीस बी किंवा सी ची लागण झालीय की नाही हे समजणार आहे.  

दरवर्षी जगभरात हिपॅटायटीस- बी किंवा सी या व्हायरसमुळे 10 लाखापेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागतो. तर दरवर्षी 15 लाखापेक्षा जास्त लोकांना एचआयव्ही एड्ससारख्या (HIV) विषाणूचा संसर्ग होतो आणि यातील साडेसहा लोक मृत्यूमुखी पडतात. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2030 पर्यंत या तिन्ही रोगांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. याच वर्षी कोपेहेगन येथील क्लिनीकल मायक्रोबॉयलॉजी आणि इन्फेक्शन डिसिज या विभागाच्या युरोपियन कॉन्फरन्समध्ये (ECCMID) याची माहिती सादर करण्यात आली आहे.  या कॉन्फरन्समध्ये रक्ताचा एक थेंब घेऊन एचआयव्ही (HIV), हिपॅटायटीस - बी (Hepatitis b) आणि सी (hepatitis c) सारख्या तिन्ही रोगांचा शोध घेतला जाऊ शकेल अशा नवीन ब्लड टेस्टचा शोध घेण्यात येत असल्याची चर्चा करण्यात आली आहे. 

आपण पाहतो की, सर्वसामान्यपणे हिपॅटायटीस-बी, सी आणि एड्स (HIV)च्या टेस्टसाठी इंजेक्शनच्या साहाय्याने रक्तवाहिन्यांतील रक्ताची एक सॅम्पल टेस्ट घेतली जाते. या टेस्टचे रिझल्ट्स चांगले असल्यामुळे अजून सर्वत्र ह्याच टेस्टचा आधार घेतला जातो. पण तुरुंग, अमली पदार्थ व्यसनमुक्ती-पुनर्वसन केंद्र आणि बेघरांसाठीचे शेल्टर होम अशा प्रकारच्या ठिकाणी ही सामान्य ब्लड टेस्ट करणे सहज शक्य होत नाही. अशा ठिकाणच्या शिबिरातून रक्ताचे सॅम्पल्स घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असते. इतर बऱ्याच बाबतीत आव्हानात्मकही असते. अशा परिस्थितीत गरीब व विकसनशील देशांना रक्ताचे सॅम्पल्स घेऊन ते पाठवणे आणि एका विशिष्ट तापमानात साठवून ठेवणे हे प्रचंड अडचणीचे असते. यामुळे या अशा परिस्थितीत या नवीन ब्लड टेस्टचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये कोरड्या रक्ताच्या सॅम्पल टेस्टचा समावेश आहे. एखाद्या सामान्य वातावरण असलेल्या खोलीच्या तापमानात रक्ताच्या सॅम्पल्सचा सहा तासांच्या आत त्याची टेस्ट करणे आणि अभ्यास करणे आवश्यक असते. पण तेच कोरड्या रक्ताचे डाग रेफ्रिजरेटरशिवाय नऊ महिने टिकू शकतात, असेही या अभ्यासात दिसून आले आहे. यासाठी फक्त एका रक्ताच्या एका थेंबाची आवश्यक लागणार आहे. या तीन व्हायरसमधून एका रक्ताच्या सॅम्पलची टेस्ट घेण्यासाठी एका नवीन टेक्निकचा वापर करण्यात आला. ही टेक्निक न्यूक्लिक अॅसिड नावाने ओळखली जाते. या टेक्निकमुळे नवीन ब्लड टेस्टची पद्धत निर्माण झाल्यामुळे भारतासारख्या विकसनशीस आणि गरीब देशांतील लाखो नागरिकांना उपयोग होऊ शकतो. कारण या देशात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे हा शोध जागतिक आरोग्याच्या दृष्टीने भारतासारख्या विकसनशील आणि इतर गरीब देशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.  हा डब्ल्यूएचओच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील एक महत्वाचा भाग आहे. पण या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि अशी रूग्णसंख्या कमी करण्यासाठी एक नवीन ब्लड टेस्ट करणे आवश्यक असल्याचा एका अभ्यासातून समोर आले आहे. या प्रकारच्या नवीन टेस्टचे कोपेहेगन, डेनमार्क येथील स्टिफन निल्सन मोलार व क्लिनीकल मायक्रोबॉयलॉजी आणि इन्फेक्शन डिसिज या डिपार्टमेंटकडून अभ्यास केला जात आहे. 

या नवीन टेस्टमध्ये व्यक्तीच्या शरिरातील रक्त सुईने टोचून घेतात. यानंतर एका फिल्टर पेपरवर रक्ताचे काही डाग गोळा केले जातात आणि हे रक्ताचे डाग कोरडे होऊ दिले जातात. यासाठी आपल्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात आढळून येणारी मेडिकलची उपकरणांचा उपयोग करण्यात येतो. या उपकरणाच्या साहाय्याने या तीन व्हायरसचा रक्तातील एका सॅम्पलचा अभ्यास करण्यासाठी एका टेक्निकचा वापर करण्यात आला होता. हा अभ्यास करत असताना एका लिक्विडसारख्या एका प्लझ्माची टेस्ट करून व्यक्तीच्या कोरड्या रक्ताचे सॅम्पल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातात. यानंतर एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि सी या व्हायरसच्या माहिती असलेल्या 20 सॅम्पलचा कोरड्या रक्ताच्यासॅम्पलच्या आधारावर अनेक पद्धतीने अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात सर्व सॅम्पल्समध्ये व्हायरस आढळून आल्याचे  दिसून आले. या रिझल्टसाठी निश्चित केलेला प्लाझ्माही पातळ करण्यात आला होता. यामुळे उपचार न केलेल्या पेशंटमध्ये आढळणार्‍या पातळीपेक्षा खूपच कमी पातळीवर व्हायरस शोधणे शक्य असल्याचे दिसून आले. 

या नवीन टेक्निकचा अभ्यास करणाऱ्या निल्सन-मोलर यांच्या मते, सध्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मेडिकल उपकरणांचा वापर रक्ताच्या एका थेंबातून एचआयव्ही, हिपाटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी व्हायरसचा शोध घेणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. तसेच, व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा खूप कमी गरज असेल त्याठिकाणीच सिरिंजच्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे. यामध्ये तुरूंग, अमली पदार्थ व्यसनमुक्ती-पुनर्वसन केंद्र आणि बेघर या तीन ठिकाणांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत ही नवीन पद्धत एचआयव्ही, हिपाटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी यासारख्या जीवघेण्या संसर्गजन्य आजारांचे लवकर निदान होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.  कारण एकाच टेस्टमध्ये हे तीनही आजार समजण्यास मदत होणार आहे. भारतासारख्या विकसनशील आणि इतर गरीब देशांसाठी ही नवीन ब्लड टेस्ट खूपच उपयोगासाठी येऊ शकते. या तीनही व्हायरसचे 2030 पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट्य जागतिक आरोग्य संघटनेने ठेवले आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंकाNarendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीकाOne Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special ReportSpecial Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Embed widget