एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यूपीएच्या कार्यकाळातील आणखी एक महाघोटाळा उघड
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यानंतर यूपीए सरकारच्या काळात आणखी एक संरक्षणविषयक घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. हॉक जेट ट्रेनरचं इंजिन खरेदी करण्यासाठी तब्बल 800 कोटी रुपयांची लाच दिल्याची बाब समोर आली आहे.
2011 साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रोल्स रॉईसमध्ये हॉक जेट ट्रेनरच्या इंजिनाच्या खरेदीसाठी 10 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. या इंजिनाच्या व्यवहारासाठी रोल्स रॉईसकडून 10 मिलियन पाऊंड म्हणजेच 800 कोटी रुपयांची लाच घेण्यात आली होती.
शस्त्रास्त्रांचा व्यवहार करणाऱ्या सुधीर चौधरींना ही लाच देण्यात आली आहे. यापूर्वीही सुधीर चौधरींवर लाच घेतल्याचे आरोप करणात आले आहेत. 2014 मध्ये चौधरींना ब्रिटनमध्ये अटकही करण्यात आली होती, पण भक्कम पुराव्याअभावी त्यांना सोडून देण्यात आलं होतं. सुधीर चौधरींना रशियातील कंपन्यांनी क्रूझ मिसाईलच्या नावाखाली 2007-08 मध्ये 100 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 7 हजार कोटी रुपये दिले होते, अशी माहितीही समोर येत आहे.
ब्रिटनमध्ये बनलेली हॉक विमानं भारतात नौदल आणि हवाईदलाकडून वापरली जातात. या विमानात ब्रिटीश कंपनी रोल्स रॉईसचं इंजिन लावण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement