एक्स्प्लोर

Guinness World Records: सर्वात जास्त वेळ केलं 'अंडर वॉटर किस'; जोडप्यानं 'व्हॅलेंटाईन डे'ला केला विश्व विक्रम

Guinness World Records: एका जोडप्यानं चक्क पाण्यामध्ये सर्वात जास्त वेळ एकमेकांना किस करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) आपलं नाव नोंदवलं आहे. 

Guinness World Records: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) वेगवेगळ्या अतरंगी रेकॉर्ड्ची नोंद होत असते. आता 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day 2023) च्या निमित्तानं एका जोडप्यानं खास रेकॉर्ड केला आहे. या जोडप्यानं चक्क पाण्यामध्ये सर्वात जास्त वेळ एकमेकांना किस करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. 

कॅनडाच्या (Canada) माइल्स क्लाउटियर (Miles Cloutier) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa)  बेथ नीले (Beth Neale) यांनी  पाण्याखाली सर्वात जास्त वेळ किस करुन रेकॉर्ड केला. त्यांच्या या रेकॉर्डची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे.  त्यांनी 4 मिनिटे 6 सेकंद एका स्विमिंग पूलमध्ये किस केलं. हा विक्रम 13 वर्षांपूर्वी इटालियन टीव्ही शो होस्ट लो शो देईनं केला होता, त्याने 3 मिनिटे 24 सेकंद किस केलं होते. माइल्स क्लाउटियर आणि  बेथ नीले दोघेही डायव्हर्स आहेत. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. माइल्स, बेथ आणि त्यांची मुलगी दक्षिण आफ्रिकेत एकत्र राहतात.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माइल्स आणि बेथ यांच्या या रेकॉर्डची माहिती देण्यात आली. 'व्हॅलेंटाईन-डे' ला हा रेकॉर्ड झाला आहे.', असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये माइल्स आणि बेथ यांचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. बेथने सांगितले, "रेकॉर्ड करण्याच्या तीन दिवस आधी मला श्वासावर नियंत्रण ठेवता येत नव्हते."  

पाहा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचं ट्वीट

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या यूट्यूब चॅनलवर देखील माइल्स आणि बेथ यांच्या या रेकॉर्डचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

पाहा माइल्स आणि बेथ यांचा व्हिडीओ: 

रेकॉर्ड करण्यापूर्वी सकाळी 7.30 वाजता माइल्स आणि बेथ यांनी अंडर वॉटर किससाठी वॉर्म अप केले. दोन आणि तीन मिनिटांच्या दोन प्रॅक्टिसनंतर त्यांनी पाण्याखाली किस करण्यास सुरुवात केली. बेथ ही तिच्या डायव्हिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला 175K एवढे नेटकरी फॉलो करतात. तिच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

संपूर्ण शरीरावर टॅटू काढत बनवला विश्वविक्रम, Body Modification करणाऱ्या 'या' जोडीची अनोखी कहाणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran US War: इराण आणि अमेरिकेची चर्चा फिस्कटली, पुढे काहीतरी भयंकर होणार, जे.डी.व्हान्स पाकिस्तानमधून काय काय म्हणाले?
इराण आणि अमेरिकेची चर्चा फिस्कटली, पुढे काहीतरी भयंकर होणार, जे.डी.व्हान्स पाकिस्तानमधून काय काय म्हणाले?
US Iran Peace Talks In Pakistan: अमेरिका आणि इराणमधील शांती वार्ता निष्फळ; अटीतटींमध्ये अडलं, जागचं टेन्शन वाढलं; इस्लामाबादच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि इराणमधील शांती वार्ता निष्फळ; अटीतटींमध्ये अडलं, जागचं टेन्शन वाढलं; इस्लामाबादच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
Iran US War: अमेरिका आणि इराणची शांती वार्ता फिस्कटली; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि इराणची शांती वार्ता फिस्कटली; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला

व्हिडीओ

Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Embed widget