Google Year in Search 2021 : नेटकऱ्यांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं?, 'या' गोष्टी आहेत Top Search
Google Year in Search 2021 : यंदाचं 2021 हे वर्ष संपत असताना वर्षभरात जगातील नेटकऱ्यांनी गूगलवर नेमकं काय सर्च केलं? हे गूगलने समोर आणलं आहे.
Google Year in Search 2021: कोरोनाचं (Corona) सावट कायम असतानाच कोरोनावरील लस (Corona Vaccine) एक नवी आशा घेऊन आली. या साऱ्यांमध्ये अखेर 2021 (2021 Year) हे वर्ष संपत आलं आहे. काही प्रमाणात गोष्टी सावरत आहेत, विविध ठिकाणं पुन्हा सुरु होत आहेत. पण ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने पुन्हा धाकधूक वाढवली आहे. असं हे अत्यंत गडबडीचं वर्ष सरताना वर्षभरात जगातील नागरिकांनी गूगलवर (Google) सर्वाधिक काय सर्च केलं? याबाबत गूगलने स्वत: माहिती दिली आहे. गूगलने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली असून यामध्ये नेटकऱ्यांनी काही गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत.
गूगलने शेअर (Google Shares Video) केलेल्या व्हिडीओमध्ये विविध भाषेतील विविध सर्चेस दाखवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक सर्च हे कोरोना महामारीसंबधी आहेत. ज्यामध्ये, 'पुन्हा लॉकडाऊन होईल का?', कोरोनाची लस कुठे मिळेल अर्थात 'वॅक्सीनेशन ड्राईव्ह' यासह टोक्यो ऑलिम्पिक्स, टी20 विश्वचषक या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्या आहेत.
भारतातील टॉप सर्च काय?
जगातील सर्चचा विचार केल्यानंतर भारताचा विचार करता यामध्ये इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL), को-विन, युरो कप, आयसीसी टी20 विश्वचषक, टोक्यो ऑलिम्पिक्स या गोष्टी मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्या आहेत. भारताने कोरोना महामारीसह खेळाच्या घडामोंडीबाबत मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलं आहे.
हे ही वाचा :
- Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
- Amazon Web Services outage : अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची सेवा काही काळासाठी खंडित, जगभरातून नेटिझन्सचा संताप
- Sarco Capsule: ना गळफास, ना आत्मदहन, आता आत्महत्येसाठीही मशीन, 5 मिनिटात विनात्रास मृत्यू, 'या' देशाची मंजुरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha