Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
Chhatrapati sambhajinagar crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून; स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून चित्रपटासारखा बनाव रचला

Chhatrapati sambhajinagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी प्राध्यापकाचा खून (Murder news) करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. मृत प्राध्यापकांचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे. (Maharashtra Crime news)
प्राथमिक माहितीनुसार, मृत प्राध्यापक आणि आरोपींमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. ‘खतरों के खिलाड़ी’(Khatro ke Khiladi) सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतरही बराच काळ कोणताही शो सुरू न झाल्याने प्राध्यापक लोंढे आरोपींकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यानंतर परत येताना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून खून केला. त्यानंतर शहरातील एका रुग्णालयाजवळ येईपर्यंत त्यांचा मोबाईल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.
यानंतर आरोपींनी मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी शहरालगत असलेल्या गेवराई तांड्याजवळ गुप्तधन असल्याची माहिती एका जेसीबी चालकाला दिली. त्याच्याकडून दोन खड्डे खणून घेतले आणि पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह त्यामध्ये पुरण्यात आला. खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच मृत राजाराम लोंढे (Rajaram Londhe Murder) यांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही देण्यात आली. याप्रकरणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तपासादरम्यान संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबांमध्ये विरोधाभास आढळून आला आणि पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघड झाला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
Crime News: सीसीटीव्ही फुटेजने आरोपींचं पितळ उघडं पाडलं?
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजची तपासणी केली असता आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होते.
आणखी वाचा






















