(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Naziha Salim : कोण आहेत नाझिहा सलीम? ज्यांना गुगलने डुडलद्वारे दिली श्रद्धांजली
Google Doodle Celebrates Naziha Salim Birthday : नाझिहा सलीम या प्रसिद्ध चित्रकार असून त्या भित्तीचित्रात निपुण होत्या. पॅरिसमधील कोल नॅशनल सुपेरीअर डेस ब्यूक्स-आर्ट्समध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
Naziha Salim Google Doodle : आज गुगलने (Google) नाझिया सलीम (Naziha Salim) यांचं गुगल डुडल (Doodle) बनवून त्यांना सन्मानित केलं आहे. नाझिहा सलीम या प्रसिद्ध इराकी चित्रकार आणि प्राध्यापक आहेत. त्यांना इराकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एख मानलं जातं. नाझिहा सलीम यांना 'बर्जील आर्ट फाऊंडेशन'तर्फे सन्मानित करण्यात आलं.
कोण आहेत नाजिहा सलीम?
नाजिहा सलीम यांचा जन्म 1927 मध्ये तुर्कीच्या इस्तंबूल शहरात झाला. नाझिहा सलीम यांचा जन्म इराकी कलाकारांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडीलही चित्रकार होते आणि आई भरतकाम कामगार होती. नाझिहा सलीम यांना तीन भाऊ होते, जे कला क्षेत्रात काम करत होते. नाझिहा याचे भाऊ जवाद सलीम हे इराकच्या सर्वात प्रभावशाली शिल्पकारांपैकी एक मानले जातात. त्यांचे दुसरे बंधू डिजाइनर तर तिसरे बंधून राजकीय कार्टुनिस्ट होते. त्यामुळे नाझिहा यांनीही लहानपणापासून कलेमध्ये विशेष रस होता.
नाझिहा यांनी बगदाद फाइन आर्ट्समधून ग्रॅज्युएशन केले. सलीम या पॅरिसमधील फ्रेस्को आणि भित्तीचित्रकार तज्ज्ञ होत्या. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि कलेमुळे, पॅरिसमधील कोल नॅशनल सुपेरीअर डेस ब्यूक्स-आर्ट्समध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ही शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या नाझिहा सलीम या पहिली महिला ठरल्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सलीम काही वर्षे परदेशात राहिल्या.
नाझिहा सलीम त्यानंतर ललित कला शिकवण्यासाठी बगदादमध्ये परतल्या आणि निवृत्त झाल्या. त्या इराकच्या अल-रुवादच्या संस्थापकांपैकी एक होत्या. अल-रुवाद हा इराकी कलाकारांचा समुदाय आहे.
कशा प्रसिद्ध झाल्या नाझिहा सलीम?
इराकी महिलांच्या समस्या चित्रांमधून मांडण्यासाठी नाझिहा सलीम या विशेष ओळखल्या जातात. त्यांच्या कलाकारीतून अनेकदा ठळक ज्वलंत मुद्द्यांचे, ग्रामीण इराकी महिला आणि ग्रामीण जीवनाचं चित्रण दिसून येते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Tina Dabi : IAS टीना दाबी झाल्या महाराष्ट्राची सून, IAS प्रदीप गवांडेंसोबत विवाहबंधनात
- Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
- Viral Video : सिंहीणीचा शिकारीचा डाव फसला, म्हशींनी केलं धोबीपछाड; पाहा थक्क करणारा व्हिडीओ
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha