(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dr. Michiaki Takahashi: चिकनपॉक्सवरील लस शोधणारे डॉ. मिचियाकी यांची जयंती; गुगलकडून अनोखं अभिवादन
Dr. Michiaki Takahashi Google Doodle : चिकनपॉक्स अर्थात कांजण्यावर लस शोधली त्या जपानचे वायरॉलॉजिस्ट डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांना गुगलनं अनोखं अभिवादन केलंय.
Dr. Michiaki Takahashi Google Doodle : आजचं गुगल डूडल Google Doodle जर आपण पाहिलं असेल तर आपल्याला त्यात एक डॉक्टर दिसतील. हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी चिकनपॉक्स अर्थात कांजण्यावर लस शोधली. जपानचे वायरॉलॉजिस्ट डॉ. मिचियाकी ताकाहाशी असं या डॉक्टरांचं नाव. डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचं आज जगभरातील लोक आभार प्रकट करत असतील. कारण कांजण्यासारख्या आजारापासून वाचवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणूनच आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुगलकडूनही डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांना अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांसाठी एक प्रभावी उपाय म्हणून ताकाशाही यांनी लशीचा शोध लागला. यानंतर जगभरातील लाखों लहानग्यांना ही लस देण्यात आली.
मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1928 रोजी जपानच्या ओसाकामध्ये झाला. त्यांनी ओसाका विद्यापीठातून मेडिकलची डिग्री घेतली. 1959 मध्ये ते ओसाका विद्यापीठात मायक्रोबियल रोग संशोधन संस्थेत रुजू झाले.
गोवर आणि पोलिओवरील लसींचा अभ्यास केल्यानंतर डॉ ताकाहाशी यांनी 1963 मध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या बेयलर कॉलेजमध्ये एक संशोधन फेलोशिप स्वीकारली. या काळात त्यांच्या मुलाला कांजण्याची लागण झाली. यामुळं त्यांना या रोगावर लस शोधण्यासाठी खरंतर मदतच झाली.
त्यानंतर डॉ. ताकाहाशी 1965 मध्ये जपानला परतले आणि प्राणी आणि मानवी ऊतींमधील जिवंत परंतु कमकुवत झालेल्या चिकनपॉक्स विषाणूचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. केवळ पाच वर्षांच्या विकासानंतर ते क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार होते. 1974 मध्ये, डॉ. ताकाहाशी यांनी विषाणूला लक्ष्य करणारी पहिली लस विकसित केली. नंतर इम्यूनोसप्रेस्ड झालेल्या रूग्णांवर संशोधन केले गेले आणि ते अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
1986 मध्ये, ओसाका युनिव्हर्सिटीच्या रिसर्च फाउंडेशन फॉर मायक्रोबियल डिसीजकडून जपानमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली एकमेव वैरिकाला लस म्हणून सुरुवात केली.
डॉ. ताकाहाशी यांनी निर्मित केलेली ही जीवनरक्षक लगेच 80 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली गेली. 1994 मध्ये, त्यांची ओसाका विद्यापीठाच्या मायक्रोबियल डिसीज स्टडी ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत या पदावर होते.
डॉ. ताकाहाशी यांना खरोखरच सलाम करायला हवा. कारण दरवर्षी कांजण्याची कित्येक प्रकरणं आज देखील समोर येतात. मात्र त्यांच्या शोधामुळं यावरील उपचार सुकर झाले. 16 डिसेंबर 2013 रोजी त्यांचं निधन झालं.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )