Coronavirus Vaccine | कोरोना व्हायरसवर लस शोधल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 87 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील 4 हजारहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
वॉशिग्टन : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस शोधल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या लसीचा कोरोना बाधित रुग्णांवर प्रयोग करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसवर उपचार होण्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 87 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील 4 हजारहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेकडून लस तयार करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. याचं पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालं आहे. माणसांवर या लसीचं परीक्षण करण्यात आलं असून त्याचा परिणाम सकारात्मक आहे.
Coronavirus | जगभरात 24 तासांत 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
अमेरिकेतील परिस्थिती अद्याप नियंत्रणात नाही, त्यामुळे 10 पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये, घराबाहेर जेवण करणं टाळा, असं आवाहनही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. अमेरिकेत हॉटेल्समध्ये डाईन-इन सुविधा बंद करण्यात आली असून केवळ टेक-अवे सुविधा सुरु आहे.
मागील 24 तासांमध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 638 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व देशांमध्ये इटलीमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. इटलीमध्ये मागील 24 तासांमध्ये 349 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण चीनमध्ये मात्र मत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. काल चीनमध्ये कोरोनामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम इराणवर झाला आहे. इराणमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या
- Coronavirus | राज्यातील एकूण रुग्ण संख्या 39 वर, मुंबईत एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट
- coronavirus | कोरोनाची मंत्रालयात धडक!, सरकारकडून मंत्रालयात नो एन्ट्रीचे आदेश
- Coronavirus | सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी तसंच धार्मिक उत्सव बंद करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- Coronavirus | राज्यातील सर्व विद्यापीठं, महाविद्यालयं बंद, नियोजित परीक्षाही 31 मार्चनंतर