एक्स्प्लोर
भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा
![भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा Germany Scrambles Fighter Planes For Jet Aircraft After Communication Break On Atc भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12205954/jet-airways.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: मुंबईहून लंडनकडे जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा ATC शी (Air Traffic Control) हवेतच संपर्क तुटल्यानं, जर्मनीच्या एअरफोर्सनं तत्परता दाखवतं विमानाला दिशा दाखवली. जर्मन एअरफोर्सनं दाखवलेल्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली.
या घटनेचा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना 16 फेब्रुवारीची असून, बोईंग-777 हे विमान मुंबईहून लंडनला चाललं होतं. यावेळी जर्मनीतील कोलोनजवळ विमानाचा ATC शी संपर्क हवेतच तुटला. यावेळी जर्मनी एअरफोर्सच्या दोन विमानांनी हवेत उड्डाण घेऊन, जेट एअरच्या विमानाच्या वैमानिकांसोबत इंटरसेप्ट कॉन्टॅक्ट स्थापन करण्यात यश मिळवलं. यानंतर जेट एअरवेजच्या विमानाचा एटीसीशी संपर्क होईपर्यंत जर्मनीच्या विमानांनी दिशा दाखवली.
जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनीही याबाबतची पुष्टी केली असून, जेट एअरवेजच्या 9W118 या विमानाचा जर्मनीतील लोकल एटीसीशी संपर्क तुटला असल्याचं मान्य केलं. पण हा संपर्क काहीच मिनिटांसाठी तुटला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.
दरम्यान, या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जर्मन एअरफोर्सनं दोन विमान तयार ठेवली होती. यानंतर हे विमान 330 प्रवासी आणि 15 क्रू मेंबरसह सुरक्षित लंडनमध्ये उतरलं. पण या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
व्हिडिओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)