![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Playboy Cover : महिला मंत्र्याचा फोटो 'प्ले बॉय' मॅगझिनवर, पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी
Marlene Schiappa on Playboy Cover : फ्रेंच मंत्री मर्लीन स्कॅपा यांचा फोटो प्ले बॉय मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्याने पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (Elisabeth Borne) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
French Minister Marlene Schiappa on Playboy Cover : फ्रेंच सरकारमधील (French Minister ) महिला मंत्र्याचा फोटो प्ले बॉय मासिकाच्या झळकला आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. फ्रेंच मंत्री मर्लीन स्कॅपा (Marlene Schiappa) यांचा फोटो प्ले बॉय (Playboy Magazine Cover) मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्याने पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फ्रेंच सरकारमधील मंत्री मर्लीन स्कॅपा या प्ले बॉय मॅगझिनवर झळकल्याने फ्रेंच सरकारच नव्हे तर संपूर्ण जग चकित झालं आहे. प्ले बॉय मॅगझिनच्या मुखपृष्ठावर मर्लीन स्कॅपा या 40 वर्षीय फ्रेच मंत्र्यांचा फोटो पाहायला मिळाला आहे. यामुळे आता चर्चा रंगली आहे.
फ्रान्स सरकारच्या मंत्री मर्लीन स्कॅपा सध्या वादात सापडल्या आहेत. मर्लीन यांनी प्लेबॉय मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे. यानंतर आता त्यांच्याच पक्षातील सदस्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मर्लीन स्कॅपा 2017 पासून फ्रान्स सरकारमध्ये मंत्री आहेत. महिला आणि LGBTQ अधिकारांबाबत त्यांची मुलाखतही या मासिकात प्रसिद्ध झाली आहे. स्कॅपा सध्याच्या सामाजिक अर्थव्यवस्था आणि फ्रेंच फेडरेशनच्या मंत्री आहेत.
प्ले बॉय हे मासिक महिलांबाबत आक्षेपार्ह कंटेटसाठी ओळखलं जातं. या मॅगझिनमध्ये महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं. या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आता फ्रेंच महिला मंत्री दिसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. प्ले बॉय मासिकासाठी फोटोशूट केल्यामुळे मर्लीन स्कॅपा यांना फ्रान्समध्ये खूप टीकेला सामोरे जावं लागत आहे. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न आणि इतर मंत्र्यांनी याला लज्जास्पद कृत्य म्हटलं आहे.
Invité ce matin sur Europe1 le Ministre de l’intérieur @GDarmanin apporte son soutien à @MarleneSchiappa sur sa Une Une de #playboy. Il cite Cookie Dingler : « vous ne me ferez pas dire de mal de Marlène Schiappa (…) être une femme libérée, c’est pas si facile » pic.twitter.com/pz50OoQdls
— Jeanne Baron (@jeannebarontv) April 2, 2023
समलिंगी आणि महिला अधिकारांवर मुलाखत
प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या मंत्री मर्लीन स्कॅपा यांनी समलैंगिक आणि महिला अधिकारांवर 12 पानांची मोठी आणि सविस्तर मुलाखत देखील दिली आहे. सोशल मीडियावर प्लेबॉय मॅगझिनचे मुखपृष्ठ शेअर करताना मर्लीन यांनी लिहिलं आहे की, 'महिलांचा त्यांच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहेत, त्यांना त्यांच्या शरीरासोबत जे हवे ते करण्यास त्या स्वतंत्र आहेत.
प्लेबॉय मासिकाच्या कव्हर पेजवर झळकल्यानंतर यावर मर्लीन स्कॅपा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात स्वतःचा बचाव करताना त्यांनी म्हटलं आहे की, फ्रान्समध्ये महिला स्वतंत्र आहेत, जर मागासलेल्या विचारसरणीच्या लोकांना याचा त्रास होत असेल तर ते सुरू ठेवा.
प्लेबॉयच्या संपादकांकडून समर्थन
मार्लीन स्कॅपा यांचा फोटो प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्याचं प्लेबॉयने मात्र समर्थन केलंय. प्लेबॉयचे संपादक जेन ख्रिस्तोफे फ्लोरेंटीन (Christophe Florentin) यांच्या मते मर्लीन स्कॅपा यांचं कर्तृत्व प्लेबॉयच्या मुखपृष्ठासाठी अतिशय सुसंगत असं आहे. त्याचं कारण सांगताना ते म्हणतात की त्या सातत्याने महिला हक्कांच्या चळवळीत अग्रभागी राहिल्या आहेत तसंच तसंच प्लेबॉय हे मासिक आता पूर्वीसारखं फक्त पुरुषाचं असं राहिलेलं नाही तर स्त्रीवादी चळवळीचं एक प्रमुख साधन बनलेलं आहे. प्लेबॉयची जगभरातली ओळख पुरुषांसाठीच्या सॉफ्ट सॉफ्ट पॉर्न नियतकालिकासारखी असली तरी ते आता पूर्णपणे खरं नाही. प्लेबॉय हे 300 पानी मूक ( mook)आहे. मूक म्हणजे बुक आणि नियतकालिक (a mix of a book and a magazine) यांचं फ्यूजन.. प्लेबॉयमधील लेख वाचनीय असतात, तसंच देशातील बुद्धीवादी लोकांसाठी प्लेबॉयमधील लेख एक मेजवानी असल्याचा दावा संपादक ख्रिस्तोफे फ्लोरेंटीन करतात. प्लेबॉयमध्ये अजूनही काही पानांवर अर्धनग्न महिलांची चित्रे असली तरी प्लेबॉय आता बरंच बदललेलं आहे, असं सांगायलाही ते विसरत नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)