Fact Check : 'तो' फोटो अफगाणिस्तानातील नाही, तर फिलिपिन्समधील! जाणून घ्या सत्य
एक फोटो सोशल मीडियासह माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे जो अफगाणिस्तानमधील असल्याचं बोललं जात आहे मात्र हा फोटो अफगाणिस्तानमधील नसून 2013 सालचा फिलिपिन्समधील फोटो आहे.
Fact Check : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीती आहे. तिथले लोक इतर देशांमध्ये पलायन करु जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच अफगाणिस्तानात हजारो विदेशी लोक देखील अडकले आहेत. यात भारतासह अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, न्यूझीलंडसह अन्य काही देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत काही देशांनी आपापल्या नागरिकांना एअरलिफ्ट करुन आपल्या देशात आणलं आहे.
दरम्यान या सर्व गोंधळात एक फोटो सोशल मीडियासह माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे जो अफगाणिस्तानमधील असल्याचं बोललं जात आहे. या फोटोमध्ये शेकडो नागरिक एका विमानात दाटीवाटीने बसलेले दिसून येत आहेत. मात्र हा फोटो अफगाणिस्तानमधील नसून 2013 सालचा फिलिपिन्समधील फोटो आहे.
IAF C 17 with 800 people airlifted....a record. That's a train load almost. The previous highest was 670. This is from Kabul Airport today. Long Live India 🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/kOmUOHnpPh
— durgeshtripathi (@durgesh_101) August 16, 2021
मूळ फोटो फिलिपिन्समधील टॅक्लोबान शहरावर विनाशकारी चक्रीवादळ धडकल्यानंतर काही दिवसांनी यूएस एअरफोर्सकडून तिथे अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यावेळचा आहे. वृत्तसंस्था राऊटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.
JUST IN: "The Crew made the decision to go" — Inside RCH 871, which saved 640 from the Taliban ... from @TaraCopp and me https://t.co/r4YvGqJZ4b pic.twitter.com/CI1mAmqjHT
— Marcus Weisgerber (@MarcusReports) August 16, 2021
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात महिला वृत्त निवेदिकांवर घातली बंदी, आता तालिबानी करणार अँकरिंग!
काही लोकांनी हा फोटो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केला आहे. काबुल विमानतळाच्या बाहेर निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या भारतीय वायुसेनेने (IAF) रेस्क्यू ऑपरेशन केले, असाही दावा या फोटोसह काही लोकांनी केला होता. मात्र हा मूळ फोटो यूएसएएफच्या वेबसाइटवर देखील आहे. तिथल्या माहितीनुसार हा फोटो 17 नोव्हेंबर 2013 रोजी सुपर टायफून हैयान वादळानंतर लष्करी विमान, सी -17 ग्लोबमास्टर III चा आहे. या विमानात 670 पेक्षा जास्त टॅक्लोबान रहिवासी होते. हैयान चक्रीवादळाने 8 नोव्हेंबर 2013 रोजी किनाऱ्यावरील प्रदेशात धुमाकूळ घालत हाहाकार केला होता आणि त्यामुळं या प्रांतातील टॅक्लोबान शहराची मोठी हानी झाली होती.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये भारतासह अन्य काही देशांचे नागरिक अडकले, किती आहे आकडा?
तालिबान्यांकडून महिला वृत्त निवेदिकांवर बंदी
अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घातली आहे. सरकारी न्यूज चॅनलच्या एका महिला वृत्त निवेदिकेला तालिबान्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. आता तालिबानी अँकर्स टीव्हीवर बातम्या देताना दिसून येणार आहेत. खदीजा अमीना नावाची एक महिला सरकारी न्यूज चॅनलमध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम करत होती. तिला तालिबान्यांनी कामावरुन काढून टाकलं. एका दिवसापूर्वीच तालिबान्यांनी म्हटलं होतं की, आमच्या राज्यात महिलांच्या हिताचं रक्षण होईल. परंतु, आता तालिबानी म्हणतायत की, देशात केवळ शरीयत कायद्याअंतर्गत महिलांना काम करण्याची परवानगी आहे. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर अफगाण न्यूज अँकर अदीजा अमीना म्हणाली की, "मी काय करु? पुढच्या पीढीकडे काहीच काम नसेल. 20 वर्षांत जे काही मिळवल, ते सर्व निघून जाईल. तालिबान तालिबान आहे, ते बदललेले नाहीत."