एक्स्प्लोर
काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, 80 मृत्यूमुखी
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ आज सकाळी साडे आठच्या सुमारास शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. स्फोटानंतर विदेश दूतावास परिसरातील सुरक्षा आणखी कडेकोट केली आहे.
स्फोटात 80 जणांचा मृत्यू झाला असून 350 नागरिक जखमी झाले आहेत.
हा स्फोट भारतीय दूतावासापासून 50 मीटर अंतरावर झाला. या परिसरात जर्मनी, अमेरिका आणि कॅनडासह इतर देशांचेही दूतावास आहेत.
या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारतीचं थोडं नुकसान झालं आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे. सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/869775310706716672
सुत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करुन हा स्फोट घडवून आणला. मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचं निवासस्थानही आहे. स्फोटामुळे 100 मीटर अंतरावर असलेल्या घरांचं नुकसान झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement