Elon Musk, Starlink: एलॉन मस्क यांचा युक्रेनला मदतीचा हात, देशात स्टारलिंक इंटरनेट सेवा केली अॅक्टिव्ह...
Elon Musk, Starlink: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाने बॉम्ब हल्ले केले आहेत.
Elon Musk, Starlink: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाने बॉम्ब हल्ले केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अनेक सेवा खंडित झाल्या आहते. याच दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. युक्रेनकडून विनंती केल्यानंतर एलन मस्क यांनी तेथे इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एलोन मस्क यांनी शनिवारी सांगितले की, त्यांची कंपनी स्पेसएक्सची स्टारलिंक सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा युक्रेनमध्ये सक्रिय करण्यात आली आहे. तसेच या रूटवर आणखीन टर्मिनल जोडण्यात येत आहे, असं ही त्यानी सांगितलं आहे.
युक्रेनच्या विनंतीनंतर एलन मस्क यांचा पुढाकार
युक्रेनचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह (Mykhailo Fedorov) यांनी अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk) यांना युक्रेनला स्टारलिंक सेवा प्रदान करण्याचे आवाहन केले. युक्रेनचे मंत्री फेडोरोव्ह यांनी एलन मस्क यांना सांगितले की, तुम्हाला मंगळवारी स्थायिक व्हायचे आहे. तुमचे रॉकेट अवकाशातून पृथ्वीवर यशस्वीपणे उतरत असतानाच रशियन रॉकेट युक्रेनचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात नागरिक आणि सैन्याला लक्ष करून हल्ले करत आहेत. फेडोरोव्ह यांनी ट्विट करत एलन मस्क यांना युक्रेनमध्ये स्टारलिंक इंटरनेट सेवा प्रदान करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून युक्रेन रशियन राष्ट्राध्यक्षांच्या हल्ल्याचा सामना करू शकेल, असं ते ट्वीटमध्ये म्हणाले म्हणाले आहेत. युक्रेनच्या मंत्र्याला उत्तर देताना एलन मस्क यांनी ट्विट केले की, स्टारलिंक इंटरनेट सेवा आता युक्रेनमध्ये सक्रिय करण्यात आली आहे.
काय आहे स्टारलिंक इंटरनेट सेवा?
स्टारलिंक 2000 हून अधिक सॅटेलाइटचा एक समूह चालवते. ज्याचा उद्देश संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पोहचवणे आहे. कंपनीने शुक्रवारी आणखी 50 स्टारलिंक सॅटेलाइट लॉन्च केले असून अनेक सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत ठेवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युद्धाच्या चौथ्या दिवशीही युक्रेनवर हल्ला सुरूच, दोन मोठ्या शहरांना घेरल्याचा रशियाचा दावा
- North Korea : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी, दक्षिण कोरियाकडून पुष्टी
- Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर? जगभरात खळबळ; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा बेलारूसला फोन