(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हम बाराह...! एलन मस्क बनले आपल्या बाराव्या बाळाचे वडील; न्यूरोलिंकच्या संचालक मस्कच्या मुलाच्या आई
Elon Musk Quietly Welcomes 12th Child: Tesla, SpaceX आणि X चे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या बाराव्या मुलाला जन्म दिला आहे. हे मूल त्यांचं आणि Neuralink डायरेक्टर Shivon Zilis यांचं आहे.
Elon Musk Welcomes 12th Child: टेस्लाचे (Tesla) संस्थापक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मस्क आपल्या बाराव्या अपत्याचे बाबा झाले आहेत. एलॉन मस्क यांच्या बाळाची आई न्यूरोलिंकच्या (Neuralink) डायरेक्टर शिवॉन झिलीस (Shivon Zilis) या आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत बोलताना मस्क यांनी सांगितलं की, हे मूल किंवा ही प्रेग्नंसी अजिबात सीक्रेट नव्हती. माझे कुटुंबीय आणि मित्र-मंडळींना याबाबत कल्पना होती. मस्क यांनी बाळाचं नाव किंवा मुलगा की, मुलगी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, मस्क यांनी बाळाबाबत गुप्तता बाळगल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं.
घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याबाबत एलॉन मस्क काय म्हणाले?
एलॉन मस्क म्हणाले की, माझ्या बाळाबाबत गुप्तता बाळगल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या सर्व चुकीच्या आहेत. आमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना याबद्दल माहिती होती.
एलॉन मस्क आणि शिवॉन झिलीस यांचं हे तिसरे अपत्य आहे. यापूर्वी, शिवॉन झिलीस यांनीच 2021 मध्ये मस्कच्या जुळ्या मुलांना जन्म दिला होता. स्ट्रायडर (Strider) आणि अझूर (Azure), अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत. शिवॉन झिलिस मस्क यांच्या ब्रेन इम्प्लांट फर्म न्यूरालिंकमध्ये काम करतात.
मस्क यांनी 2000 मध्ये जस्टिन विल्सनशी आपली पहिली लग्नगाठ बांधली होती. जस्टिन आणि मस्क यांना 5 मुलं आहेत. 2008 मध्ये दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर मस्क यांनी 2010 मध्ये तुलुलाह रिलेशी लग्न केलं आणि दोघं 2016 मध्ये वेगळे झाले होते.
एकापेक्षा जास्त अपत्य असण्याबाबत नेहमीच बोलतात एलॉन मस्क
2018 मध्ये, मस्क यांनी कॅनेडियन संगीतकार ग्रिम्सला डेट करायला सुरुवात केलेली. दोघांनाही तीन मुलं आहेत. हे जोडपं 2021 मध्ये वेगळं झालं. घटत्या जन्मदरावर मस्क यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "अनेक देश आधीच रिप्लेसमेंट रेटमध्ये मागे आहेत आणि हा ट्रेंड दर्शवितो की, हे सर्वांसोबत होईल. ही वस्तुस्थिती आहे. ते म्हणाले की, किड्स रिप्लेसमेंट रेट 2.1 आहे आणि लवकरच जग या रेटच्या खाली पोहोचेल. Page Six ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. जुलै 2022 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मस्कने सांगितलं होतं की, त्यांना मोठं कुटुंब हवं आहे.