एक्स्प्लोर
Soybean Crisis: 'खाजगीत विकलेल्या मालाची तफावत द्या', NAFED केंद्र सुरू नसल्याने शेतकरी संतप्त
सोयाबीन (Soybean) खरेदीसाठी नाफेड (NAFED) केंद्र सुरू न झाल्याने आणि अतिवृष्टीची (Ativrushti) मदत न मिळाल्याने राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. 'ज्या शेतकऱ्यांनी आता मार्केटमध्ये माल विकलाय, त्या शेतकऱ्याला तुम्ही आज मार्केटची ही जी तफावत आहे, ती प्रत्येक शेतकऱ्याला दिली पाहिजे,' अशी थेट मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकणे भाग पडत आहे, ज्यामुळे क्विंटलमागे सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. सरकारने वेळेवर खरेदी केंद्र सुरू केली असती तर ही लूट थांबली असती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासोबतच, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जाहीर झालेली दहा हजार रुपयांची मदत अद्याप खात्यात जमा झाली नसल्याने रब्बी पेरणीसाठीही पैसा नसल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत. कायदा केवळ सामान्य लोकांसाठी असतो का, आमच्यासाठी नाही का? असा संतप्त सवालही शेतकरी करत आहेत.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















