एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Elon Musk and Twitter Deal : डील पूर्ण होण्यापूर्वी एलन मस्क यांची ट्विटर मुख्यालयाला भेट; सोबत नेलेली वस्तू पाहून कर्मचाऱ्यांसह नेटकरीही हैराण

Elon Musk and Twitter Deal : एलन मस्क बुधवारी अचानक सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटरच्या मुख्यालयात आले. यादरम्यान त्यांनी सोबत एक बेसिन सिंकही नेला, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

Elon Musk and Twitter Deal : गेल्या अनेक दिवसांपासून एलन मस्क ट्विटर डिलमुळे (Twitter Deal) चर्चेत आहे. पण अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आला. जेव्हा एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या कार्यालयात (Twitter Office) पाऊल ठेवलं. न्यायालयानं शुक्रवारपर्यंत 44 बिलियन डॉलर्सची ही डील पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. या मुदतीच्या दोन दिवस आधीच एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर बायोमध्येही काही बदल केले आहेत. मस्क यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये लोकेशन 'ट्विटर हेडक्वॉर्टर' असं अपडेट केलं. त्यापाठोपाठच त्यांनी डिसक्रिप्टर 'चीफ ट्वीट' असं लिहिलं. त्यानंतर एलन मस्क यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले. मस्क ट्विटरच्या कार्यालयात गेले खरे, पण ते रिकाम्या हातांनी नाही, तर एक बेसीन सिंक घेऊन पोहोचले. 

सोशल मीडियावर व्हायरल होतंय ट्वीट  

एलन मस्क यांनी ट्विटर हेडक्वॉर्टर्समध्ये एन्ट्री घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एलन मस्क यांनी जो व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये ते ट्विटर हेड क्वॉर्टर्समध्ये एक बेसीन सिंक घेऊन जाताना दिसत आहेत. मस्क स्वतः बेसीन सिंक उचलून ट्विटर ऑफिसमध्ये प्रवेश घेत आहेत. या व्हिडीओला त्यांनी एक कॅप्शनही दिलं आहे. 'Entering Twitter HQ – let that sink in!', असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओ ट्वीट करताना दिलं आहे. 

एक दिवसापूर्वी बँकर्सची बैठक 

ट्विटर ऑफिसमध्ये पोहोचण्याच्या एक दिवस आधी एलन मस्क यांनी मंगळवारी या डीलसंदर्भात निधी उपलब्ध करून देणाऱ्या बँकर्ससोबत बैठक घेतली होती. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी ट्विटरच्या चीफ मार्केटिंग ऑफिसरनी कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवून माहिती दिली की,  "मस्क स्टाफला संबोधित करण्यासाठी या आठवड्यात सॅन फ्रांसिस्को मुख्यालयाचा दौरा करतील. शुक्रवारी कर्मचारी त्यांच्याशी थेट संवाद साधू शकतील. दरम्यान, डेलावेअर चॅन्सरी कोर्टाचे न्यायाधीश कॅथलीन मॅककॉर्मिक यांनी मस्क यांना हा करार पूर्ण करण्याचे आणि शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डील पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. 

कर्मचाऱ्यांनी लिहिलं खुलं पत्र 

दरम्यान, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनी या आठवड्यात एक खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी करार पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या एलन मस्कच्या कथित योजनेला विरोध केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
Embed widget