Coffee Shop : एक कप कॉफी 'पडली' महागात! मोजावे लागले 25 कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?
Coffee Shop Case : एका रेस्टॉरंटला एका कप गरम कॉफी 25 कोटी रुपयांना पडली. हॉटेल कर्मचाऱ्याने महिलेवर गरम कॉफी सांडली, यामुळे कंपनीला आता 3 दशलक्ष डॉलर्स द्यावे लागणार आहेत.
Coffee Shop Case : तुमच्याही हातून कधी एखादं भांडं निसटतं किंवा खाद्यपदार्थ सांडतात. पण, एका व्यक्तीच्या हातून एक कप कॉफी (Coffee) पडली. पण, ही एक कप कॉफी त्याला चांगलीच महागात पडली. एका कर्मचाऱ्याच्या हातातून गरम कॉफीचा कप सांडला, आणि त्यामुळे कंपनीला 3 मिलियन डॉलरचं नुकसान झालं. आता तुम्ही असा विचार करत असाल की, ही कॉफी खूप महाग असेल, त्यामुळे खूप नुकसान झालं असेल. तर, असं मूळीच नाही. मग हे नेमकं प्रकरण काय ते सविस्तर वाचा.
नेमकं प्रकरण काय?
2021 मध्ये, एक 70 वर्षीय महिला जॉर्जियातील डंकिन आउटलेटमध्ये कॉफी प्यायला गेली होती. तिथे तिने एक कप गरम कॉफी ऑर्डर केली. कर्मचार्याने कॉफी आणली पण, त्यासोबतच एक छोटीशी चूक घडली. कॉफीच्या कपाचं झाकण थोडं मोकळं होतं आणि गरम कॉफी चुकून त्या महिलेच्या पायावर पडली. यामुळे महिला चांगलीच भाजली. या महिलेने हे प्रकरण इथेच सोडलं नाही तर, तिथे थेट कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर डंकिन कंपनीला नुकसानभरपाई म्हणून 3 मिलियन डॉलर्स दंड म्हणजे 25 कोटी रुपये देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
या प्रकरणी काय युक्तिवाद करण्यात आला?
लॉ फर्म मॉर्गन अँड मॉर्गनचे बेंजामिन वीच यांनी कोर्टात सांगितले की, 'महिलेची ऑर्डर आणताना कर्मचाऱ्याने लक्ष दिले नाही आणि कपचे झाकण उघडे ठेवले. त्यामुळे गरम कॉफी महिलेच्या मांडी, कंबर आणि पोटावर पडली. परिणामी महिलेला दोन आणि तीन डिग्रीच्या बर्न्स झाले.
याप्रकरणात न्यायालयाला सांगण्यात आलं की, 'जखमा इतक्या गंभीर होत्या की महिलेला बर्न युनिटमध्ये बराच काळ उपचारासाठी राहावं लागलं. या घटनेमुळे महिलेचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तिला पुन्हा चालायला शिकावं लागलं. आजही ती उन्हात जाऊ शकत नाही. महिलेला नेहमी तिच्या जखमांवर मलम आणि मलई लावावी लागते. महिलेला उपचारासाठी 2 लाख डॉलर्स खर्च करावे लागले.
कोर्टाने काय निर्णय दिला?
या प्रकरणातील संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर, गेल्या मंगळवारी कोर्टात, डंकिन' चालविणारी फ्रेंचाइजी गोल्डन डोनट्सने संबंधित महिलेला 3 दशलक्ष डॉलर्सची नुकसानं भरपाई देणार असल्याचे मान्य केलं. भारतीय चलनानुसार 3 डॉलरची किंमत 24 कोटी 97 लाख 20 हजार रुपये होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :