(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Robot Cafe : जगातील पहिला रोबोट कॅफे, माणूस नाही फक्त रोबोटच करणार काम
World's First Robot Cafe : दुबईमध्ये यावर्षी जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. याचे नाव डोना सायबर कॅफे असेल. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास खुला असेल.
Donna Cyber Cafe : जगभरात अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. मानवाने अशा रोबोटची (Robot) निर्मिती केली आहे, जे भविष्यात मानवाप्रमाणे सर्व काम करू शकतात. जे मनुष्य आज करू शकतो कदाचित त्याहूनही चांगले हे रोबोट भविष्यात करू शकतील. त्यामुळे येत्या काळात माणसाच्या जागी रोबोट काम करताना दिसले, तर त्यात नवल वाटायला नको. आता जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. दुबईमध्ये जगभरातील पहिला आणि एकमेव पूर्णपणे रोबोटिक ऑपरेटेड असा कॅफे सुरु करण्यात येणार आहे.
World's First Robot Cafe : जगातील पहिला रोबोट कॅफे
दुबईमध्ये यावर्षी जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास खुला असेल आणि यामध्ये एकही मनुष्य काम करणार नाही. या रोबोट कॅफेमध्ये एकही माणूस काम नसेल हा, कॅफे पूर्णपणे रोबोटचं चालवतील. यामध्ये फक्त रोबोटच काम करतील. म्हणजेच तुमची कॉफी बनवण्यापासून ते तुम्हाला कॉफी सर्व्ह करण्यापर्यंतची सगळी कामं रोबोटच करतील. दुबईमध्ये उघडण्यात येणारा हा कॅफे जगातील पहिला कॅफे मानला जाईल, जिथे कोणत्याही माणसाशिवाय संपूर्ण कॅफे फक्त रोबोटच चालवतील.
Donna Cyber Cafe : रोबोट कॅफेचे नाव काय?
या वर्षी दुबईमध्ये हा कॅफे उघडण्यात येईल. हा जगातील एकमेव पूर्णपणे रोबोट-ऑपरेटेड कॅफे असेल. या रोबोट कॅफेचे नाव डोना सायबर कॅफे असेल. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास सुरु असले. या कॅफेमध्ये काम करणारे रोबोट कोणताही सामान्य रोबोट नसून आधुनिक सुपरमॉडेल रोबोट असणार आहेत. येथे तुम्हाला कॉफी, आइस्क्रीम आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स मिळतील.
रोबोट तुमचे मनोरंजनही करेल
हे खास सुपरमॉडेल रोबोट कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची विशेष काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. कॅफेमध्ये बसून जर कोणत्याही ग्राहकाला कंटाळा आला तर हे सुपरमॉडेल रोबोट त्याला रंजक किस्से सांगून मनोरंजन करेल आणि त्याच्याशी बोलून त्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय हे रोबो ग्राहकांच्या भावना समजून घेण्यासही सक्षम आहेत. म्हणजेच तुमचे हावभाव पाहून तुमचा मूड कसा आहे हे या रोबोटला कळेल.
सुपरमॉडेल रोबोटचे नाव काय आहे?
डोना सायबर कॅफेच्या निर्मात्यांनी या सुपरमॉडेल रोबोटबद्दल बोलताना मीडियाला सांगितले की, रोबोट बनवण्यासाठी त्याचे भाग रशियामधून आयात करण्यात आले आहेत. या सुपरमॉडेल रोबोटचे वैज्ञानिक भाषेतील सध्याचे नाव रोबो-सी2 असे आहे. हा रोबोट आरडीआय रोबोटिक्सने बनवला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सुपरमॉडेल रोबोट महिलेसारखा दिसतो आणि याचे हावभावही हुबेहुब महिलेसारखे आहेत.