एक्स्प्लोर
मादाम तुसाँमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांची जागा घेतली!

लंडन : अमेरिकेच्या अध्यक्षपदापाठोपाठ आता लंडनमधील मादाम तुसाँ म्युझियममध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामांची जागा घेतली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मेणाचा पुतळा मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनावरण करण्यात आलं. उन्हामुळे टॅन झालेली त्वचा आणि विशिष्ट पद्धतीने विंचरलेले केस दाखवण्यात आले आहेत. म्युझियमच्या ट्विटर हॅण्डलवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 20 कलाकारांनी सहा महिन्यात हा पुतळा साकारला आहे. https://twitter.com/MadameTussauds/status/821719063139217408
अमेरिकेच्या अध्यक्षपदी हिंदू व्यक्ती असावी, ओबामांचं स्वप्न
ट्रम्प यांचा पुतळा बनवण्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ट्रम्प यांच्या पुतळ्याला निळ्या रंगाचा सूट, पांढरा शर्ट आणि लाल टाय परिधान केली आहे. हा पुतळा व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसप्रमाणे असलेल्या सेटअपमध्ये ठेवण्यात आला आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये मिळालेल्या अविश्वसनीय विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. मादाम तुसाँ म्युझियमच्या ओव्हल ऑफिस सेटअपमध्ये ट्रम्प यांचा पुतळा ठेवल्यानंतर, तिथून अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचा पुतळा हटवला आहे.थँक्यू मोदी, बराक ओबामांचा पंतप्रधान मोदींना कॉल
या संग्रहालयात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांचा पुतळाही आहे. 20 जानेवारीपासून डोनाल्ड ट्रम्प सत्तेत असेपर्यंत लोकांना त्यांचा पुतळा पाहायला मिळणार आहे.आणखी वाचा























