एक्स्प्लोर
भारतासाठी नरेंद्र मोदींचे कार्य अतुलनीय : डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
टेक्सास : भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
भारत आणि अमेरिकेने नोकऱ्या देण्याचे प्रमाण वाढवले आहे. दोन्ही देशांमध्ये जवळपास 33 टक्के बेरोजगारी कमी झाली आहे, असे ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेसाठी सीमा सुरक्षा अतिशय महत्वाचा विषय आहे. मुस्लिम कट्टरपंथीयांसोबत एकत्रिपणे लढा देऊ असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला.
ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी या ऐतिहासीक कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने मी अत्यंत आनंदी आहे. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छाही दिल्या. ट्रम्प म्हणाले की, मी मोदींबरोबर आहे, हे मी माझे नशीब समजतो. भारत-अमेरिका एकमेकांचा सन्मान करतात, असेही ते म्हणाले.
अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने आयोजीत ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर हजारो नागिराकांनी अभूतपूर्व स्वागत केले. मोदींनी देखील सर्वप्रथम उपस्थित सर्व नागिरकांना हात जोडून अभिवादन केले. यानंतर त्यांनी अमेरिकन सिनेटर्सची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑफ ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement