एक्स्प्लोर

पाच राज्यातील यशाबद्दल अभिनंदन, ट्रम्प यांचा मोदींना फोन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फोनवरुन पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं. व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव शॉन स्पाइसर यांनी ही माहिती दिली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवलं. पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं. देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपने समाजवादी पार्टी आणि बसपाला पराभवाची धूळ चारत 403 पैकी 325 जागांवर विजय मिळवला. सपा आणि काँग्रेसला 54, तर बसपाला केवळ 19 जागांवर निजय मिळवता आला. गोव्यात भाजपची काँग्रेसवर मात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बहुमतासाठीची अग्निपरीक्षा पार पाडली. गोवा विधानसभेत भाजपने 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. WEB-RESULTS-FNL 40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं. तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मत केलं. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला. अशाप्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा सहजरित्या पार केला. विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17 भाजपला 13 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलं. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बहुमत भाजपने देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये मित्रपक्षांसह 325 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस-सपा 54, बसपा 19 आणि 5 अपक्षांनी विजय मिळवला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. उत्तराखंडमध्येही भाजपने घवघवीत यश मिळवलं. 70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपचे त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मणिपूर आणि गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नसली तरी पंजाबमध्ये मात्र काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शपथ घेतली. संबंधित बातम्या :

पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता, मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं

मनोहर पर्रिकर गोव्याचे 13वे मुख्यमंत्री, कोंकणीतून शपथ

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM  : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Dhangekar In Vegetable Market : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; सपत्नीक रविंद्र धंगेकरांचा मार्केटमध्ये फेरफटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
Rain : किल्लारीत अवकाळीचा धुमाकूळ, लातूर-धाराशिवमध्ये पावसाच्या सरी; आंबा बागांचे नुकसान
Rain : किल्लारीत अवकाळीचा धुमाकूळ, लातूर-धाराशिवमध्ये पावसाच्या सरी; आंबा बागांचे नुकसान
Embed widget