एक्स्प्लोर

Iran US War : इराण आवरणार नाहीच, युद्धही संपणार नाही; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा ट्रम्प यांना अहवाल, युद्धाचा खर्चही महाग

CIA Report On Iran War : इराणवर हल्ला केल्यानंतर खामेनी सरकार कोसळेल असा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अमेरिकन गुप्तचर अहवालाने फेटाळल्याची माहिती आहे. या युद्धात अमेरिकेचा हजारो कोटींचा खर्च झाला आहे.

Iran US War : इराणवर हल्ला करून तेथील कट्टरतावादी सरकार हटवू असा दावा करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता स्वतःचं डोकं धरून बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्याला कारणीभूत आहे तो म्हणजे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) दिलेला अहवाल. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, खामेनींचा मृत्यू झाला असला तरीही इराणमधील सत्ताधारी नेतृत्व अजूनही स्थिर असून सरकार कोसळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेला दावा फोल ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

CIA Intelligence Report On Iran War : इराणमध्ये नेतृत्व अजूनही स्थिर

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, इराणमधील कट्टर नेतृत्व अजूनही सत्तेत मजबूत आहे. त्यामुळे युद्ध संपवण्याचा मार्ग सहज नाही, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतरही देशातील एकजूट कायम असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या अहवालावर व्हाईट हाऊसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Iran Us War Cost : 10 दिवसांत अमेरिकेचा 83 हजार कोटींचा खर्च

या युद्धाचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेने अवघ्या 10 दिवसांत सुमारे 83 हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांवर : 28 हजार कोटी रुपये

हवाई मोहिमांसाठी : 1200 कोटी रुपये

नौदल मोहिमांसाठी : 700 कोटी रुपये

या आकडेवारीवरून युद्ध अमेरिकेसाठी किती महाग ठरत आहे, हे स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू आहे.

Donald Trump Claim On Iran War : ट्रम्प यांचा विजयाचा दावा कायम

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध जिंकल्याचा दावा कायम ठेवला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणचे अनेक महत्त्वाचे नेते मारले गेले असून इराणची 58 जहाजे नष्ट करण्यात आली आहेत. तसेच इराणचे लष्कर, वायुदल आणि नौदल जवळपास उद्ध्वस्त झालं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अमेरिका जेव्हा ठरवेल तेव्हा युद्ध थांबेल आणि ते लवकरच संपणार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. 

Iran Conditions On War : युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 3 अटी

दुसरीकडे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्ध थांबवण्यासाठी तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. 

तेहरानच्या कायदेशीर हक्कांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

2. युद्धामुळे झालेल्या नुकसानाची आर्थिक भरपाई

3. भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही याची ठोस हमी

इराणच्या या अटी पूर्ण झाल्यासच युद्ध थांबवण्याच्या दिशेने पुढील पावले उचलली जातील, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget