एक्स्प्लोर

Finland Wants To Join NATO: रशियाच्या इशाऱ्याकडे केलं दुर्लक्ष; नाटोमध्ये सामील होण्यास तयार, फिनलँडची घोषणा

Finland Wants To Join NATO: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारने रविवारी जाहीर केले की, त्यांचा देश युक्रेन आणि रशियन युद्धादरम्यान, पाश्चात्य लष्करी संघटना नाटोमध्ये सामील होण्यास इच्छुक आहे.

Finland Wants To Join NATO: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारने रविवारी जाहीर केले की, त्यांचा देश युक्रेन आणि रशियन युद्धादरम्यान, पाश्चात्य लष्करी संघटना नाटोमध्ये सामील होण्यास इच्छुक आहे. नॉर्डिक देशाच्या या घोषणेमुळे 30 सदस्यीय नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. हेलसिंकी येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो आणि पंतप्रधान सना मारिन यांनी ही घोषणा केली.

येत्या काही दिवसातच फिनलँडच्या संसदेत या निर्णयाला पाठिंबा दिला जाऊ शकतो. संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, फिनिश सरकार कदाचित पुढील आठवड्यात ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयात औपचारिक सदस्यत्व अर्ज सादर करेल. तत्पूर्वी रशियाने म्हटले आहे की, फिनलँडचा नाटोमध्ये प्रवेश हे एक धोक्याचं लक्षण आहे, ज्यावर ते लवकरच प्रतिक्रिया देणार. मात्र फिनलँडच्या या पावलावर ते कशा प्रकारे प्रतिक्रिया देणार, हे रशियाने अद्याप स्पष्ट केलं नाही.

फिनलँडने नाटोचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न केले सुरू

स्वीडनसोबतच फिनलँडनेही नाटोचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनवर हल्ल्यानंतर रशिया लगतचे बरेच देश नोटोचे सदस्यत्व घेण्यासाठी धडपड करत आहेत. या युद्धावरून फिनलँड आणि स्वीडनने त्यांच्या तटस्थतेच्या धोरणावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. दोन्ही देशांचे लोक नाटोमध्ये सामील होण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान, युरोपियन युनियन सदस्य बाह्य हल्ल्याच्या प्रसंगी एकमेकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. मात्र हे आश्वासन बहुतांशी कागदावरच आहे. युरोपियन युनियनच्या सामूहिक संरक्षण धोरणापेक्षा NATO ची क्षमता अधिक मजबूत आहे.

एर्डोगन यांचा फिनलँड आणि स्वीडनला विरोध 

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील होण्याच्या विरोधात आहेत. फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील होण्यास तुर्कीचे समर्थन नाही, असे एर्डोगन म्हणाले आहेत. एर्डोगन यांच्या म्हणण्यानुसार, हे नॉर्डिक देश कुर्दिश लढवय्यांचे समर्थन करतात, ज्यांना तुर्की दहशतवादी मानतो.

इतर महत्वाच्या बातम्या: 

'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळ, इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने दिला निर्णय

Highest Temperature in Pakistan : पाकिस्तानमध्ये सुर्याचा प्रकोप, जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Nilesh Lanke on Sujay Vikhe : 'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Yogi Aadityanath Sabha Sindhudurg : राणेंसाठी अमित शाह, योगी सिंधुदुर्गात; 1 मे रोजी सभाRaksha Khadse : एकनाथ खडसेंनी आशीर्वाद दिले यातच सगळ आलं Jalgaon Lok SabhaChhatrapati Sambhajinagar Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेची रॅली, राज ठाकरेंचे फोटो झळकलेEknath Khadse Jalgoan : गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी रक्षा खडसे विजय मिळवतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Nilesh Lanke on Sujay Vikhe : 'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार
मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार
Bhaskar Jadhav : संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
Vishal Patil Sangli Loksabha : विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
Embed widget