एक्स्प्लोर

Panvel Crime: पनवेल हादरलं! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा

Panvel Crime news: 27 मार्च रोजी कामानिमित्त मुंबईत आलेली ही महिला नरळेच्या संपर्कात आली. त्यावेळी त्याने तिला पनवेलमधील आपल्या घरी पाहुणचाराच्या निमित्ताने बोलावले, जिथे त्याची पत्नीही उपस्थित होती.

Panvel Crime News: कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना फसवून लैंगिक शोषण केल्याचा आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रदीप नरळे (वय 34) याला अटक केली असून, त्याची पत्नी रेणुका नरळे आणि भाऊ प्रवीण नरळे हे दोघे सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Crime  news)

पाहुणचाराच्या बहाण्याने गुंगीचं औषध दिलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप नरळे हा अंधेरी येथील एका विमा कंपनीच्या शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याची ओळख नागपूर शाखेतील 32 वर्षीय महिला शाखा व्यवस्थापकासोबत ऑनलाइन मिटिंगदरम्यान झाली. त्यानंतर कामाच्या निमित्ताने त्याने महिलेशी संपर्क वाढवला. हळूहळू तो वैयक्तिक नात्यात बदलला. 27 मार्च रोजी कामानिमित्त मुंबईत आलेली ही महिला नरळेच्या संपर्कात आली. त्यावेळी त्याने तिला पनवेलमधील आपल्या घरी पाहुणचाराच्या निमित्ताने बोलावले, जिथे त्याची पत्नीही उपस्थित होती.

पाहुणचाराच्या बहाण्याने नरळे याने महिलेला गुंगी आणणारे औषध मिसळलेले जेवण दिले. जेवणानंतर ती बेशुद्ध पडताच, त्याने पत्नीच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. दुसऱ्या दिवशी पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर तिला आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नरळे दाम्पत्याने तिचे अश्लील व्हिडिओ दाखवत बदनामीची धमकी दिली आणि पैशांची मागणी सुरू केली.

महिलेकडून उकळले सुमारे 8 लाख 11 हजार रुपये

भीतीपोटी पीडित महिलेकडून त्यांनी सुमारे 8 लाख 11 हजार रुपये उकळले. त्यानंतर तिने आपल्या पतीला संपूर्ण प्रकार सांगितला आणि दोघांनी मिळून नागपूरच्या सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी प्रकरण पनवेल शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची पत्नी आणि भाऊ फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget