'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळ, इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने दिला निर्णय
England Court on Baldness : इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने पुरुषाला ‘टकलू’ म्हणणं हा लैंगिक छळ आहे, असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सध्या चर्चेत आला असून यामुळे लैंगिक छळाची व्याप्ती वाढली आहे.
England Court on Baldness : अनेकवेळा लोक एकमेकांना त्यांच्या व्यक्तीमत्वावरून, सवयींवरून किंवा दिसण्यावरून वेगवेगळ्या नावांनी हाक मारताना किंवा टिंगल, टवाळी करताना पाहायला मिळातात. यामध्ये 'टकल्या', 'जाड्या अशाप्रकारे शब्द सर्रास वापरले जाताना दिसतात. मात्र आता असे शब्द वापरण्यावर एका न्यायालयाने निर्णय दिला आहे. इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने पुरुषाला 'टकल्या' किंवा 'टकल' असं म्हणणं, लैंगिक छळ असल्याचं म्हटलं आहे. न्यायाधिकरणाचा हा वेगळा निर्णय सध्या चर्चेत आला आहे.
पुरुषांना टकल्या म्हणणं लैगिंक छळ असल्याचं इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणानं म्हटलं आहे. हा निर्णय मनोरंजक असला तरी यामुळे लैंगिक छळाची व्याप्ती वाढली आहे. टोनी फिन हे एका कंपनीत जवळपास 34 वर्षे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत होते. त्यांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, फिनने कंपनी मालकाविरुद्ध समानता कायदा 2010 अंतर्गत तक्रार दिली. जेमी किंगने कंपनीवर त्यांना ‘टकल्या’ असं म्हणत लैंगिक छळ केला, असा दावा किंग यांनी केला. कंपनीने या आरोपावर कोणताही विवाद केला नाही.
एम्प्लॉयमेंट जज ब्रेन यांनी मत मांडलं की, 'टक्कल' हा शब्द लैंगिकतेशी संबंधित आहे. न्यायाधीश ब्रेन यांच्या अध्यक्षतेखालील तीन पुरुष न्यायाधीशांच्या पॅनलने या संदर्भात निकाल दिला. न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आपल्या निकालात टक्कल पडण्यावरील टिका किंवा टिपण्णी हा केवळ अपमान किंवा लैंगिक छळ असू शकते का, अशा अनेक कारणांवर विचारविनिमय केला.
न्यायाधीश ब्रेन यांनी या प्रकारणाचा निकाल देताना नमूद केलं की, 'टकल्या शब्दाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंध आहे. याचा संबंध लैंगिकतेशी आहे. कारण टकलं पडणं ही समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळली जाते. त्यामुळे एखाद्या पुरुषाला टकल्या म्हणणं हा लैंगिक छळ असू शकतो.' त्यामुळे त्यांनी निकालात म्हटलं की, पुरुषाला टकल्या म्हणणे हा लैंगिक छळ आहे.
रोजगार न्यायाधिकरणाचे निरीक्षण
1. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या टकलावर त्याला दुखावण्याच्या उद्देशाने टिप्पणी केली. हे अनावश्यक होते आणि अवमान करणारे होते.
2. व्यक्तीचा अवमान करण्याच्या उद्देशानेच टकल्या शब्दाचा वापर केला गेला. हे तक्रारदार कर्मचाऱ्याच्या लिंगाशी संबंधित असल्यामुळे लैंगिक छळाची तक्रार योग्य आहे.
3. सार्वजनिक हितासाठी अशा तक्रारींचा विचार करून त्यावर निर्णय घेणं आवश्यक आहे. अशी चूक करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे.
महत्त्वाच्या इतर बातम्या