एक्स्प्लोर

Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Phaltan Doctor Death: फलटणच्या रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती. तिने हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

Phaltan Doctor Death: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्युमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधिकारी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तरुणीने हातावरील सुसाईड नोटमध्ये (Suicide News) लिहून ठेवले होते. या तरुणीने फलटण येथील हॉटेल मधुदीपमधील (Hotel Madhudeep) एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून हॉटेल मधुदीप प्रचंड चर्चेत आले होते. डॉक्टर तरुणीला या हॉटेलमध्ये बोलावून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. (Phaltan Doctor Suicide News)

या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळेस पोलिसांना बोलावले त्यावेळी पोलिसांनी यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडली. त्यानंतर पोलिसांना पाचरण केले असता पोलीस लगेच आले. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मी गेली 30-35 वर्ष झाले सामाजिक कार्यात काम करतोय. चांगले निर्णय घेतले, त्याच्यामुळे काही लोक मला बदनाम करतात. आम्ही 23 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीला खोली दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तिने कॉल केला होता, तोपर्यंत ती व्यवस्थित होती. रात्री हॉटेलमध्ये चेक इन करताना तिने सांगितले होते की, मला सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचे आहे. परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता संशय आला त्यावेळेस  आम्ही वकिलांच्या सल्ल्यानुसार दरवाजा उघडला, त्यावेळेस तिने फास घेतलेला पाहायला मिळाले. त्यानंतर तात्काळ आम्ही पोलिसांना पाचारण केलं आणि पोलिसांना आम्ही सगळे सहकार्य केल्याचे दिलीप भोसले यांनी सांगितले.

Satara News: डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या तेव्हा खूप पॅनिक वाटत होत्या, नेमकं काय झालं?

हॉटेल चालक म्हणून एखादा व्यक्ती इतक्या काळ खोलीत राहतो तर तुमची जबाबदारी नव्हती का, असा प्रश्न विचारला असता दिलीप भोसले यांनी म्हटले की, हो आमची जबाबदारी होती. मात्र, आम्हाला असं वाटलं की, रात्री उशिरा आल्यामुळे त्यांनी काही मागितले नसेल आणि नेमकी साडेबारा वाजता शिफ्ट चेंज झाली. जेव्हा आम्हाला संशय आला त्यावेळेस आम्ही दार उघडले.

ज्यावेळेस ती हॉटेलमध्ये आली त्यावेळेस सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला रुम दिली. तेव्हा नंतर कुणीच रुममधून बाहेर आलं नाही. दार वाजवले असता त्यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. ज्यावेळेस डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आली त्यावेळेस ती पॅनिक वाटत होती. त्यांना गाडीदेखील आत घेता आली नाही. आमच्या वॉचमनने गाडी आतमध्ये घेतली. गेली 30-35 वर्षे झालं मी काम करतो आहे. त्याच्यामुळे विरोधक जाणुनबुजून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे ही हत्या नसून ही आत्महत्या आहे, असे हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

नाव लिहिलं, चावी घेऊन गेली, दरवाजा उघडताना...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या फलटणमधील डॉक्टर तरुणीचा हॉटेलमधील CCTV समोर

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget