एक्स्प्लोर
Phaltan Doctor Death: पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशीर केल्याने रुम उघडली, हॉटेल मालकाचं स्पष्टीकरण
फलटणमधील हॉटेल मधुदीपमध्ये (Hotel Madhudip) महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मालक दिलीप भोसले (Dilip Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. 'आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा गंभीर आरोप हॉटेल मालकांनी केला आहे. सुरुवातीला पोलिसांना बोलावले असता, त्यांना येण्यास उशीर होत असल्याने वकिलांचा सल्ला घेऊन रूम उघडली आणि त्यानंतर पोलीस तात्काळ आल्याचे दिलीप भोसले यांनी स्पष्ट केले. डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचे आणि रूममध्ये जातानाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) जाहीर करून, ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी हत्या की आत्महत्या यावरून चर्चा सुरू असताना, भोसले यांनी बदनामीच्या कटाकडे लक्ष वेधले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















