(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona in China : चीनमध्ये कोरोनाची दहशत, बीजिंगमध्ये व्हायरस स्फोटाचा इशारा, शांघायमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचणी
Coronavirus Outbreak in Beijing : बीजिंगमध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी घेण्यात येत आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाईट क्लब आणि काही मनोरंजन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
Coronavirus Outbreak in Beijing : कोरोना महामारीमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. याचे कारण राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. येथे कोविड-19 च्या वाढत्या परिस्थितीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा सरकारी आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने बीजिंगमधील कोरोना स्फोटाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
चीनमध्ये खबरदारी
बीजिंगमधील दोन जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी घेण्यात येत आहे. कोविडचा प्रसार कमी करण्यासाठी येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाईट क्लब आणि काही मनोरंजन स्थळे बंद करण्यात आली आहेत. यासोबतच हेअर आणि ब्युटी सलूनशी संबंधित केसेसमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी चीनची व्यावसायिक राजधानी शांघायमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे.
बीजिंगमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण
बीजिंगमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हेव्हन सुपरमार्केट बार म्हणून ओळखल्या जाणार्या बारशी जोडली गेली आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे की, शुक्रवारी शहरातील 61 नवीन संक्रमित रुग्णांपैकी काही जण बारमध्ये गेले होते. बीजिंग म्युनिसिपल गव्हर्नमेंटचे प्रवक्ते जू हेजियान यांनी मीडियाला सांगितले की, 'हेवन सुपरमार्केट बार'शी येथे जाऊन आलेल्या लोकांमध्ये कोरोना संक्रमण झपाट्याने वाढला. ज्यामुळे नुकताच झालेला उद्रेक अतिशय स्फोटक आहे आणि त्यामुळे संसर्ग अधिक वेगाने पसरला आहे.
चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत किती मृत्यू झाले?
शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत बीजिंगमध्ये कोविड-19 चे 46 नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या कोणतेही नवीन निर्बंध जाहीर केलेले नाहीत. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार, 140 दशलक्ष लोकसंख्येच्या देशात कोविड-19 महामारीमुळे 5,226 मृत्यू झाले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच चीन अत्यंत सावध आहे आणि येथे कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
चीनमध्ये झिरो कोविड धोरण
जगभरात कोरोना विरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या संसर्गाचे प्रमाण जागतिक मानकांपेक्षा खूपच कमी असल्याचे म्हटले जात आहे. असे असूनही, चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी लागू आहे आणि त्याअंतर्गत कोरोनाबाबत खूप कठोरता आहे. चीन सरकारचा असा विश्वास आहे की झिरो कोविड धोरणांतर्गत देशातील वृद्ध आणि वैद्यकीय व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.