(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron China Connection: ओमिक्रॉनचे चीन कनेक्शन आहे तरी काय? WHO ने व्हेरियंटचे नाव हेच का ठेवले?
Omicron China connection : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला ओमिक्रॉन हे नाव का देण्यात आले याबाबत चर्चा सुरू आहेत.
Omicron China Connection: कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन जगातील 10 देशांमध्ये आढळला आहे. हा व्हेरियंट अधिक वेगाने फैलावत असल्याचे म्हटले जात आहे. हा नवा व्हेरियंट आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली असून अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले आहेत. ओमिक्रोन स्ट्रेन डेल्टा स्ट्रेनपेक्षा सातपटीने अधिक वेगाने फैलावत असल्याचे म्हटले जात आहे. या व्हेरियंटचा चीनचा संबंध असल्याचे म्हटले जाते.
कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच जागतिक आरोग्य संघटना चीनच्या दबावात काम करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. अमेरिका, युरोपीयन देशांनी सातत्याने हा आरोप केला. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटला नाव देताना ग्रीक वर्णमालेतील 15 वे अक्षर ओमिक्रॉनची निवड करण्यात आले. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने जाणूनबुजून व्हेरिएंटच्या नावासमोरील दोन अक्षर वगळले.
ग्रीक वर्णमालेतील 13 वे अक्षर NU (V), 14 वे अक्षर जाई (XI) या दोन अक्षरांना सोडले. नवीन विषाणूबाबत गोंधळ होऊ नये यासाठी Nu हा शब्द सोडून देण्यात आला. मात्र, 14 वे अक्षर XI सोडून दिले कारण हे सामान्य उपनाम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या या निर्णयावरून पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाणीवपूर्वक XI नाव वगळले असल्याचा आरोप काही देशांनी केला आहे.
कोरोनाचा संसर्ग चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आरोप केला होता. त्यांनी सातत्याने हा आरोप लावून धरला होता. जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठिशी घातले असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता.
पाहा: Rajesh Tope Interview: ओमिक्रॉनची धास्ती, आहे किती घातकी? मंत्री राजेश टोपे 'माझा'वर
दरम्यान, दक्षिण आफ्रिकामधील रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालेय. पण फक्त ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळेच रुग्णाची संख्या वाढत असल्याचेही समोर आलेलं नाही. इतर व्हेरिएंटचे आणि समूह संसर्गामुळेही रुग्णामध्ये वाढ झालेली असू शकते. ओमिक्रॉन व्हेरिएंटची गंभीरता समजण्यासाठी आणखी काही दिवस अथवा आठवडे लागू शकतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron variant : ओमिक्रॉन व्हेरियंटचे सावट! केंद्राने राज्यांना दिल्या 'या' सूचना
ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज