Omicron variant : ओमिक्रॉन व्हेरियंटचे सावट! केंद्राने राज्यांना दिल्या 'या' सूचना
Omicron variant : केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून खबरदारीचे उपाय आखण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने काही सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.
Omicron variant Center direct to State : कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन' आढळल्यानंतर जगभरात खबरदारीचे उपाय आखले जात आहेत. भारताने ही सावधगिरीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत.
राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवणे, त्यांनी मागील कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. संसर्गाची जोखीम असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांची तत्पर INSACOG लॅबमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात यावे, अशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे.
काही राज्यांमध्ये एकूण चाचणी तसेच RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याची बाब समोर आली आहे. केंद्राच्या पत्रात त्या राज्यांची नावे नमूद करण्यात आली नाहीत. मात्र, काही राज्यांमध्ये कमी चाचणी होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. राज्यांनी चाचणीसाठी पायाभूत सुविधा मजबूत केल्या पाहिजेत आणि चाचणी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे अशी स्पष्ट सूचना राज्यांना करण्यात आली आहे.
कोविड हॉटस्पॉटवर देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. हॉटस्पॉटवर सातत्याने देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी INSACOG प्रयोगशाळेत पाठवण्यात यावे अशी केंद्राने सूचना दिली आहे. त्याशिवाय, RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याची सूचना केंद्राने राज्यांना दिली आहे. महासाथीच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची सूचना केंद्राने केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकांचे ऑक्सिजन अभावी हाल झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron variant : ओमिक्रोन व्हेरिएंटला थोपवण्यात भारतीय सक्षम?, डॉ. रवी गोडसे म्हणतात...
Omicron variant : ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का? राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य
कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha