(Source: ECI/ABP News/ABP Majha)
COVID-19 Vaccine : अमेरिकेत Johnson & Johnson च्या लसीला पुन्हा मंजुरी, रक्ताच्या गाठी तयार होत असल्याच्या तक्रारीमुळे आणली होती स्थिगिती
COVID-19 Vaccine : अमेरिकेत Johnson & Johnson च्या लसीला पुन्हा मंजुरी देण्यात आली होती. रक्ताच्या गाठी तयार होत असल्याच्या तक्रारीमुळे या लसीच्या वापरासाठी स्थिगिती आणली होती.
COVID-19 Vaccine : अमेरिकन आरोग्य नियामक मंडळानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा पुन्हा वापर करण्यास परवानगी दिली आहे. Johnson & Johnson ची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर अमेरिकेने या लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती आणली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचं अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं होतं.
अमेरिकेच्या आरोग्य नियामक मंडळानं शुक्रवारी बोलताना सांगितलं की, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा पुन्हा वापर सुरु होऊ शकतो. लसीकरणानंतर रक्तामध्ये गाठी तयार होत असल्याच्या चिंतेमुळे लसीकरण अभियान थांबवण्यात आलं होतं. तसेच लसीच्या वापरावरही स्थगिती आणली होती. लसीच्या वापरावर स्थगिती आणण्याचा प्रस्ताव 14 एप्रिल रोजी सादर करण्यात आला होता. एका विशेषतज्ज्ञांच्या पॅनलनं रोख उठवण्याची शिफारस केली आहे. कारण वॅक्सिनचे फायदे नुकसानापेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं आहे.
अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या वापरासाठी पुन्हा मंजुरी
फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनचे प्रमुख जनेट वुडकॉक यांनी सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिवेंशनसोबत संयुक्त प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, कोविड-19 वॅक्सिनचे संभाव्य फायदे त्यांच्या नुकसानापेक्षा 18 वर्षांवरील लोकांमध्ये जास्त दिसून आले." सीडीसी प्रमुख रोशेन वालेन्सकी यांनी सांगितलं की, रक्ताच्या गाठी फारच कमी लोकांमध्ये तयार झाल्याचं दिसून आलं होतं. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, नियामक लसींवर संशोधन सुरु आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या डाटानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनची कोविड-19 लस घेणारी 3.9 मिलियन महिलांपैकी 15 जणांना गंभीर ब्लड क्लॉट्सचा सामना करावा लागला आणि तीन जणांचा मृत्यू झाला.
अमेरिकेत Johnson & Johnson लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती दिली होती
Johnson & Johnson ची लस घेतल्यानंत केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही कमी होत आहेत अशी तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक आहे असं प्रशासनाने सांगितलं आहे. अमेरिकेत Johnson & Johnson च्या 68 लाख लसींचे डोस देण्यात आले असून आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही.
या घटनेनंतर Johnson & Johnson च्या लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे. पण या स्थगितीचा परिणाम अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर होणार नसून मॉडर्ना आणि फायझर या इतर दोन लसींचा वापर सुरूच राहिल असं फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या तक्रारींची पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतरच या लसीचा वापर करायचा की नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
कोरोना संकटात भारताने जशी मदत केली तशीच आम्ही देखील करण्यास कटिबद्ध, अमेरिकन अध्यक्षांची ग्वाही