Coronavirus | जगभरात कोरोनाचा कहर! 42 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त, तर 2 लाख 87 हजार रुग्णांचा मृत्यू
जगभरात 15 लाखांहून अधिक लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर या व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असणारा देश अमेरिका आहे. अमेरिकेने गेल्या 24 तासात 1 हजार 8 लोक गमावले असून एकूण बळींची संख्या 81 हजार 795 वर पोहोचली आहे.
Coronavirus | जगभरातमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. 212 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 74,228 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 3403 ने वाढ झाली आहे. वल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 2 लाख 87 हजार 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 लाख 26 हजार 975 लोक कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. जगभरातील जवळपास 73 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त दहा देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 31 लाखांवर पोहोचली आहे.
जगभरात कुठे किती रुग्ण, किती मृत्यू?
जगभरात एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये समोर आले आहेत. तर जवळपास एक तृतियांश मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत. अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. जिथे 32,065 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इंग्लंडमधील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 223,060 वर पोहोचला आहे. इंग्लंडमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या स्पेनपेक्षा कमी आहे. यानंतर रुस, फ्रांन्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, ब्राझील, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळत आहे.
अमेरिका : एकूण रुग्ण 1,385,834, एकूण मृत्यू 81,795 स्पेन : एकूण रुग्ण 268,143, एकूण मृत्यू 26,744 इंग्लंड : एकूण रुग्ण 223,060, एकूण मृत्यू 32,065 रुस : एकूण रुग्ण 221,344, एकूण मृत्यू 2,009 इटली : एकूण रुग्ण 219,814, एकूण मृत्यू 30,739 फ्रान्स : एकूण रुग्ण 177,423, एकूण मृत्यू 26,643 जर्मनी : एकूण रुग्ण 172,576, एकूण मृत्यू 7,661 ब्राझील : एकूण रुग्ण 169,143, एकूण मृत्यू 11,625 टर्की : एकूण रुग्ण 139,771, एकूण मृत्यू 3,841 इराण : एकूण रुग्ण 109,286, एकूण मृत्यू 6,685 चीन : एकूण रुग्ण 82,918, एकूण मृत्यू 4,633
10 देशांमध्ये एक लाखांहून अधिक कोरोना बाधित :
स्पेन, इटली, इंग्लंड, रुसमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त सहा देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. अमेरिकेसह या 10 देशांमध्ये एकूण 30 लाख 86 हजार कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त रुस आणि ब्राझीलमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटेन) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा 81 हजारांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-10 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर गेला आहे.
फ्रान्सने काल दिवसभरात 263 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 26 हजार 643 बळी गेले असून एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 77 हजारावर पोहोचला आहे. तर रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत रशिया आता जगात चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे 2 लाख 21 हजारांवर रुग्णांचा आकडा आहे. काल 94 बळी गेले, तर एकूण 2009 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 54 ची भर पडली असून एकूण 6685 मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या 1 लाख 9 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे बेल्जियममध्ये काल 51 लोक मृत्यूमुखी पडले तर, एकूण बळींचा आकडा 8707 वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल 16 बळी घेतले तिथे एकूण 5456 लोक दगावले आहेत. दक्षिण कोरियात गेल्या पाच दिवसात एकही बळी गेला नाही, तिथे रुग्णांची संख्या 35 ने वाढली एकूण रुग्ण 10 हजार 909 तर मृतांचा आकडा 256. पाकिस्तानात रुग्णांची संख्या 30 हजार 941 च्या वर पोहोचली आहे. तिथे काल 8 बळी गेले, एकूण मृतांचा आकडा 667 वर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या :
हलगर्जीपणा झाला तर परिस्थिती गंभीर होईल; लॉकडाऊन शिथील करणाऱ्या देशांना WHOचा इशारा
लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी
कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट येण्याची शक्यता, जर्मनीच्या नामांकित RKI संस्थेचा इशारा कोरोनाची लस तयार, लवकरच पेटंट मिळवणार; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा Coronavirus | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विषाणू पुन्हा रिअॅक्टीव्ह होतो का?