Coronavirus | इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू; जगभरातील परिस्थिती गंभीर
कोरोना व्हायरसचा सामना संपूर्ण जग करत आहे. अशातच कोरोनामुळे चीननंतर आता इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत 475 लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढत जात आहे. सध्या याचा सर्वाधित परिणाम इटलीमध्ये दिसून येत आहे. इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार नऊशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढचं नाहीतर इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 4,207 नवे रूग्ण समोर आले आहेत. त्यामुळे इटलीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 35 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
ब्रिटनमध्येही कोरोनाचा हाहाकार
इटलीव्यतिरिक्त ब्रिटनमध्येही परिस्थिती गंभीर आहे. येथे एका दिवसांत 33 जणांचा मृत्यू झाला असून 676 नवी रूग्ण समोर आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्व शिक्षण संस्था बंद कण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
Coronavirus | मोदी पुन्हा रात्री आठची वेळ साधणार, देशाला संबोधित करणार
इतरही देशांमधील परिस्थिती गंभीर
इराणमध्ये आणखी 147 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,135 वर पोहोचला आहे. इराणसोबतच पाकिस्तान, युएई, बहरनी आणि कुवेत या देशांमध्येही कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसनने बुधवारी देशात आपातकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. तसेच सौदी अरबमधील देशांनी मशिदीत नमाज पठण करण्यावर बंदी आणली आहे.
जगातील महासत्ता म्हणून असलेल्या अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसने पीडितांची संख्या 6500 पार गेली आहे. तर 115 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus | कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई आजपासून अंशत: लॉकडाऊन, 50 टक्के दुकानं बंद
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून रूग्णांची संख्या 165 झाली आहे. त्यापैकी 25 नागरिक विदेशी आहेत. सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रात एकूण 45 कोरोना बाधित आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आहेत.
WHO ने सांगितलं 'मानवतेचा शत्रु'
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने कोरोनाला 'मानवतेचा शत्रु' असं संबोधलं आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी बुधवारी सांगितलं की, 'कोरोना व्हायरस 'मानवतेचा शत्रु' असून त्याचा परिणाम दोन लाखांहून अधिक लोकांवर झाला आहे.
संबंधित बातम्या :
येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
परदेशात राहणाऱ्या 276 भारतीयांना कोरोनाची लागण, सरकारची लोकसभेत माहिती