एक्स्प्लोर
Coronavirus Update | परदेशात राहणाऱ्या 276 भारतीयांना कोरोनाची लागण, सरकारची लोकसभेत माहिती
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 147 वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या ज्या वुहान शहरातून या कोरोनाची व्हायरसरची सुरुवात झाली होती, तेथील परिस्थिती आता जवळपास नियंत्रणात आली आहे.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसची लागण विदेशात राहणाऱ्या 276 भारतीय नागरिकांना झाली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली आहे. यात कोविड 19 ची लागण झालेले सर्वाधिक 255 भारतीय नागरिक हे इराणमध्ये असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. लोकसभा दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितलं की, 255 भारतीय नागरिक इराण, संयुक्त अरब अमिरातमध्ये 12,इटलीत 5, श्रीलंका, श्रीलंका, हॉन्गकॉन्ग, रवांडा, कुवैत मध्ये प्रत्येकी एका भारतीय नागरिकाला कोविड 19 ची बाधा झाली आहे.
इराणमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या भारतीयांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी भारतीय दूतावासची टीम काम करत आहे. तसेच इराण सरकारसोबत यासंदर्भात भारत सरकार सातत्याने संपर्कात देखील आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे इराणमध्ये हजाराहून अधिक भारतीय असे आहेत जे भारतात परत येऊ इच्छित आहेत. आज एका विमानाने जवळपास 201 भारतीयांना सर्व तपासण्या करुन भारतात आणलं गेलं आहे. भारतात आतापर्यंत इराण, इटली आणि चीनसह अन्य देशांमधून 1600 हून अधिक भारतीयांना परत आणले गेले आहे.
फिलिपाइंस आणि मलेशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना आणि खासकरुन विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात तयार केलेलं कोविड19 सेल काम करत आहे. या दोन्ही देशातील दूतावासांशी संपर्क सुरु असल्याचे जयशंकर यांनी सांगितलं.
देशात 147 जणांना कोरोनाची लागण
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 147 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये 122 भारतीय आहेत, 25 परदेशी नागरिक आहेत तर 14 लोकांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे.
राज्यात रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे.
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
- पुणे - 8
- पिंपरी-चिंचवड - 10
- मुंबई - 7
- नागपूर - 4
- यवतमाळ - 3
- कल्याण - 3
- नवी मुंबई - 3
- रायगड - 1
- ठाणे - 1
- अहमदनगर - 1
- औरंगाबाद - 1
- महाराष्ट्र- 42
- केरळ- 25
- उत्तर प्रदेश- 16
- हरियाणा- 16
- कर्नाटक- 11
- दिल्ली- 10
- लडाख- 8
- तेलंगणा- 5
- राजस्थान- 4
- जम्मू काश्मीर- 3
- ओदिशा- 1
- पंजाब- 1
- तामिळनाडू- 1
- उत्तराखंड- 1
- आंध्र प्रदेश- 1
- पश्चिम बंगाल- 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement