Coronavirus : टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण
Corona Outbreak in World : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे.
Corona Virus Updates : जगभरात कोरोना विषाणू संसर्गाचा (Corona Virus) वेग प्रचंड वाढला आहे. एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये मोठ्या कोरोना रुग्ण आढळत असून अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागोमाग जपान आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.
कोरोनाने पुन्हा जगाची चिंता वाढवली
जपान, अमेरिका, ब्राझीलसह चीनमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. काही रिपोर्टनुसार, चीनमध्ये 20 लाख मृत्यू होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. तर चीनमधील 80 ते 90 टक्के नागरिकांना कोरोना संसर्घ होण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे. चीनमची राजधानी बीजिंगमध्ये 60 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. तसेच औषधे आणि खाटांचा अभाव निर्माण झाला आहे. अहवालानुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले असून मृतदेहाचा खच पडल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
कोरोनाशी दोन हात करण्याची भारत सरकारची तयारी
जगातील कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता भारत सरकारने उपायजोना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. यामुळे कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटबाबत अधिक माहिती मिळेल आणि या व्हेरियंटला थोपण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशात कोविड निर्बंध लागू होण्याचीही शक्यता आहे.