Coronavirus Outbreak : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारतात पुन्हा मास्कसक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या..
Bharati Pawar On Corona : भारती पवार पत्रकार परिषदेत म्हणाल्या, चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
Bharati Pawar On Corona : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) पुन्हा हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोविड रुग्णांची (Covid) संख्या अचानक वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात (India) उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक (Mask Compulsory) करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सांगितलंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या
"बैठकी दरम्यान होणार महत्वाचे निर्णय"
आज होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे, तसेच या बैठकी दरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर असून पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. काय म्हणाल्या भारती पवार?
"भारतात मास्क बंधनकारक करण्याची शक्यता"
भारती पवार पुढे म्हणाल्या, चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमधून येणारे प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात मास्क देखील बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"इतर देशांकडून खबरदारी घेण्यास सुरुवात" - भारती पवार
भारती पवार म्हणाल्या, भारतात दोन वर्षापूर्वी कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जीवघेण्या महामारीने संपूर्ण देश ठप्प झाला होता. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात आज त्याच पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होण्यास सुरुवात होणार आहे, कोरोनासारखी गंभीर परिस्थिती वेशीवरच थोपवण्यासाठी आज केंद्रीच्या वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे.
भारताकडून 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण - भारती पवार
भारती पवार म्हणाल्या, जगात आठवडाभरातच कोरोनाची 36 लाख रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने भारताकडून खबरदारी घेण्यात येत आहे. भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना भारतात येऊ नये याकरिता आज केंद्रीय पातळीवर महत्वाची बैठक होणार आहे.
इतर बातम्या
Winter Assembly Session : विधानसभेत सरकारची मोठी घोषणा! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती करणार